विशेष प्रतिनिधी
आग्रा – समाजवादी पक्षाने त्यांच्या नावाने पर्फ्युम काढला असला तरी त्यास त्यांच्या राजवटीमधील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीचा दुर्गंधी आहे, जी कोणत्याही सुवासामुळे नष्ट होणार नाही, अशी टीका उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केली.BJP targets Samajwadi Perfume in UP
सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी नुकताच समाजवादी पर्फ्युम लाँच केला. त्यावरून शर्मा म्हणाले की, आधीच्या सरकारचा द्वेषभाव, जातीयवाद, लांगूलचालन, गुन्हेगारी कदापी धुवून निघणार नाही. अत्तर हे स्वच्छता, पारदर्शकता, सुशासन आणि जबाबदारीचे प्रतीक असले पाहिजे.
सपाने नुकतीच सुहेलदेव भारतीय समाज पक्षासह (सुभासपा) युती जाहीर केली आहे. याबद्दल शर्मा म्हणाले की, विरोधी पक्षांनी कितीही आघाड्या केल्या तरी त्यांचा पराभवच होणार आहे. लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा, दर वेळी वेगवेगळी समीकरणे जुळवून युती करूनही विरोधकांचा धुव्वा उडाला आहे. आता आणखी एकदा पराभूत होण्याची तयारी त्यांनी चालविली आहे. फक्त यावेळी त्यांच्याबरोबर छोटे पक्ष आहेत.
BJP targets Samajwadi Perfume in UP
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात भाजपाच सत्ता राखणार, सुधारलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळेच यश, योगी आदित्यनाथांच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती
- गोवा, मणिपूरमध्ये भाजपच मारणार बाजी, कॉँग्रेसपेक्षा आपला जादा पसंती
- पंजाबमध्ये कॉँग्रेसला पराभवाचा धक्का बसणार, आप मारणार विधानसभा निवडणुकीत बाजी
- सध्याच्या राजकारणात पोरखेळ, राज्यात बिग बॉसचा शो सुरू, पंकजा मुंडे यांची टीका
- एनसीबीचे उपमहासंचालक म्हणाले यंत्रणा स्वच्छ करायचीय, समीर वानखेडे यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते