• Download App
    Narayan Rane Arrest : सूडाच्या भावनेने नारायण राणेंना अटक, संबित पात्रा म्‍हणाले, महाराष्ट्रात झाली लोकशाहीची हत्या! । BJP SpokesPerson Sambit Patra Criticizes Thackeray Govt On Narayan Rane Arrest

    Narayan Rane Arrest : सूडाच्या भावनेने नारायण राणेंना अटक, संबित पात्रा म्‍हणाले, महाराष्ट्रात झाली लोकशाहीची हत्या!

    Narayan Rane Arrest : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या वक्तव्यामुळे नारायण राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि त्यांना नाशिक पोलिसांनी अटकही केली आहे. केंद्रीय मंत्र्याला अटक झाल्याने भाजपने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, राज्य सरकारने सूड भावनेमुळे राणेंना अटक केली असून महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आहे. BJP SpokesPerson Sambit Patra Criticizes Thackeray Govt On Narayan Rane Arrest


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्‍ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या वक्तव्यामुळे नारायण राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि त्यांना नाशिक पोलिसांनी अटकही केली आहे. केंद्रीय मंत्र्याला अटक झाल्याने भाजपने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, राज्य सरकारने सूड भावनेमुळे राणेंना अटक केली असून महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आहे.

    राजधानीतील पक्षाच्या मुख्यालयात पत्रकारांना संबोधित करताना भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले की, महाराष्ट्र सरकारमध्ये 27 मंत्री असे आहेत ज्यांच्याविरोधात भ्रष्टाचारासह अनेक गुन्हे दाखल आहेत, परंतु ते त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. उलट केवळ एका वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्र्याला मात्र अटक झाली आहे.

    महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या

    राणेंच्या अटकेबद्दल पात्रा म्हणाले, “ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. हे एक प्रकारे लोकशाहीचे हनन आहे. लोकशाहीची हत्या आहे.” ते म्हणाले नारायण राणेंनी काही शब्द जरूर वापरले असतील, जे टाळता आले असते. पण हीच सहिष्णुता आहे का? हाच कायदा आहे का? महाराष्ट्राचे काही मंत्री म्हणतात कायदा सर्वोच्च आहे. भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करणे, लोकांचे जीव धोक्यात घालणे हाच कायदा आहे का? अशा प्रकारे एखाद्या मंत्र्यावर 30 ते 40 FIR दाखल करणे, हा कायदा आहे का?

    पात्रा यांनी सवाल केला की, आज महाराष्ट्रात सध्या 42 पैकी 27 मंत्री असे आहेत, ज्यांच्यावर विविध खटले सुरू आहेत, पण यापैकी किती जण तुरुंगात गेले आहेत? भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अडकलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा उल्लेख करत पात्रा म्हणाले की, तेथे तर दरमहा 100 कोटींची वसुली करणारे सरकार आहे.

    पात्रा यांचा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल

    संबित पात्रा म्हणाले की, “ही जी महाआघाडी सरकार आहे त्यांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? दरमहा 100 कोटी रुपये वसूल करणे! प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, पण तेथेही अनिल देशमुख यांना कोणतीही सवलत मिळाली नाही. अनिल देशमुख तुरुंगात आहेत का? त्यांना अटक झाली का? एकदाही पोलीस अधिकारी त्यांच्या पोर्चमध्ये गेला? नाही… 100 कोटी वसूल करणे ठीक आहे का? ते म्हणाले, “अनिल परब यांचे काळे कृत्य सर्व वर्तमानपत्रात छापून आले आहेत. त्यांना अटक करण्यात आलेली नाही, परंतु एका वक्तव्यामुळे तुम्ही अटक कराल. ही मोठी खेदाची बाब आहे. मला वाटते की आज महाराष्ट्रात लोकशाहीचे हनन झाले आहे. महाराष्ट्र सरकार सूड भावनेने ज्या प्रकारचे राजकारण करत आहे, हे सर्व हिंदुस्तानची जनता पाहत आहे आणि ते त्याचे उत्तर देतील.

    BJP Spokesperson Sambit Patra Criticizes Thackeray Govt On Narayan Rane Arrest

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!