• Download App
    कर्नाटकात भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, त्यात 2 महिलांचा समावेश; 7 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली|BJP releases second list of 23 candidates in Karnataka, including 2 women; Tickets of 7 sitting MLAs cut off

    कर्नाटकात भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, त्यात 2 महिलांचा समावेश; 7 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली

    वृत्तसंस्था

    बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी भाजपने बुधवारी रात्री उशिरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात दोन महिलांसह 23 जणांची नावे आहेत. याआधी भाजपने 189 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. कर्नाटक निवडणुकीसाठी पक्षाने 224 जागांपैकी 212 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत.BJP releases second list of 23 candidates in Karnataka, including 2 women; Tickets of 7 sitting MLAs cut off

    दुसऱ्या यादीत 7 विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्यात आली. 212 जागांवर आतापर्यंत 19 विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत.



    शेट्टर यांचे नाव दुसऱ्या यादीतही नाही

    आतापर्यंत एकाही जागेसाठी ईश्वरप्पा आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. शेट्टर हे हुबळी-धारवाडचे आमदार आहेत. त्यांनी मंगळवारी दावा केला की, पक्षाने त्यांना निवडणूक न लढवण्यास सांगितले होते. तिकीट न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या वक्तव्यानंतर त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले, जिथे त्यांनी बुधवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली.

    अश्विनी संपांगी KGF जागेवरून निवडणूक लढवणार

    कोलार गोल्ड फिल्ड्स (KGF) मधून भाजपने अनुसूचित जातीच्या उमेदवार अश्विनी संपांगी यांना उमेदवारी दिली आहे. दावणगेरे उत्तरचे विद्यमान आमदार रवींद्रनाथ यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यांच्या जागी लोकिकेरे नागराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी, बयंदूरचे विद्यमान आमदार सुकुमार शेट्टी यांचेही नाव दुसऱ्या यादीत नाही. त्यांच्या जागेवरून गुरुराज गुंटूर यांना तिकीट देण्यात आले आहे. हावेरीमधून नेहरू ओळेकर यांच्या जागी गविसीडप्पा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जेडीएस आमदार जीटी देवेगौडा यांचे जावई रामचंद्र गौडा यांना चामुंडेश्वरीतून तिकीट देण्यात आले आहे.

    भाजपच्या पहिल्या यादीत 189 उमेदवारांची नावे

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी रात्री 189 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात फक्त 8 महिला होत्या. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिगगावमधून निवडणूक लढवणार आहेत. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे सुपुत्र बीवाय विजयेंद्र आपल्या वडिलांच्या शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

    त्याचवेळी कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी तिकीट न मिळाल्याने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते बुधवारी म्हणाले होते की, मी गुरुवारी कठोर निर्णय घेईन आणि शुक्रवारी माझे काम सुरू करेन. त्यांच्या राजीनाम्याबाबत प्रदेश काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी ते आमच्या संपर्कात नसल्याचे म्हटले आहे.

    BJP releases second list of 23 candidates in Karnataka, including 2 women; Tickets of 7 sitting MLAs cut off

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!