• Download App
    भाजप अध्यक्ष नड्डा यांचा ट्विटर अकाउंट हॅक; युक्रेन मदतीचे आवाहन करणारे संदेश प्रसारित। BJP president Nadda's Twitter account hacked; broadcasts messages calling for Ukraine help

    भाजप अध्यक्ष नड्डा यांचा ट्विटर अकाउंट हॅक; युक्रेन मदतीचे आवाहन करणारे संदेश प्रसारित

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा ट्विटर अकाउंट हॅक केल्याने खळबळ उडाली होती. परंतू तो रविवारी पूर्ववत कार्यरत देखील झाला आहे. BJP president Nadda’s Twitter account hacked; broadcasts messages calling for Ukraine help

    त्याच्या ट्विटर अकाउंटचे नामकरणं ” ICG OWNS INDIA”, असे केले होते. युक्रेनच्या क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून देणगी द्या, असे त्यांच्या अकाउंटवर दिसले. त्याचे स्क्रीन शॉट देखील पाहायला मिळाले. युक्रेनच्या पाठीशी उभे रहा, क्रिप्टो करन्सीतून युक्रेनच्या सहाय्य करा, असे आवाहन करणारे संदेश त्यांच्या अकाउंटवर झळकले.



    अर्थात ते त्यांनी पाठविले नव्हते. त्यामुळे खाते हॅक झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान , तुमचा अकाऊंट हॅक झालेला नाही, सर्व देणग्या या युक्रेनला पाठविल्या जातील, असे हिंदीत लिहिले होते. केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या कानी ही बाब घातली असून त्यांनी न केलेले ट्विट त्यांच्या खात्यातून हटविले आहेत तसेच त्यांच खाते पूर्ववत केले आहे.

    BJP president Nadda’s Twitter account hacked; broadcasts messages calling for Ukraine help

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    SC Notice : मनमानी विमान भाडेवाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर; केंद्र, DGCA आणि AERA यांना नोटीस

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली

    CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’