• Download App
    घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट झाल्याचा भाजप खासदाराचा दावा, तृणमूल कॉंग्रेसवर हल्ल्याचा आरोप । BJP MP accuses TMC for bomb attack

    घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट झाल्याचा भाजप खासदाराचा दावा, तृणमूल कॉंग्रेसवर हल्ल्याचा आरोप

    वृत्तसंस्था

    कोलकता : भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट झाल्याचा दावा केला आहे. याआधी आठ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरासमोर किमान तीन गावठी बॉम्ब फेकण्यात आले होते. BJP MP accuses TMC for bomb attack

    या प्रकरणाची चौकशी एनआयए सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आपल्यावर दबाव टाकण्यासाठी आणखी हल्ले केले जात आहेत, असा आरोप अर्जुन यांनी केला. अर्जुन यांनी या हल्ल्याबद्दल सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. तृणमूल आणि पश्चिम बंगाल पोलिसांकडून अभय मिळत असल्याने गुन्हेगारांना भीती वाटत नाही. ते मोकाट फिरतात. पोलिस हे तर तृणमूलचे दादा बनले आहेत. मला अशा हल्ल्यांची कधीही भीती वाटत नाही आणि मी घाबरणार नाही.



    तृणमूलचे नेते पार्थ भौमिक यांनी हा आरोप फेटाळून लावला. अर्जुन आणि त्यांच्या लोकांनीच हा कट आखल्याचा दावा त्यांनी केला. बॉम्ब फेकण्यात आले नाहीत, तर ते जेथे ठेवले होते तेथे फुटले असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

    BJP MP accuses TMC for bomb attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी