विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : मदरशांमध्ये देशविरोधी धडे दिले जातात. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि शिक्षणमंत्र्यांना राज्यातील मदरसे बंद करण्याची विनंती कर्नाटकचे भाजप आमदार एमपी रेणुकाचार्य यांनी केली आहे.BJP MLA demands closure of anti-national action in madrassas
राज्यातील इतर शाळांमध्ये जे शिकवले जाते ते तिथे शिकवावे. अशा शाळा नाहीत का जिथे सर्व धमार्चे विद्यार्थी शिकतात, असेही एमपी रेणुकाचार्य यांनी मदरशांवर प्रश्न उपस्थित करीत म्हटले आहे. ते म्हणाले, हिजाबच्या वादावरून काही देशविरोधी संघटनांनी राज्यात बंदची हाक दिली आहे.
हा इस्लामिक देश आहे का? हे आम्ही सहन करणार नाही. देशविरोधी संघटनांच्या कर्नाटक बंदचा काँग्रेस नेत्यांनी सभागृहात बचाव केला, असेही एमपी रेणुकाचार्य म्हणाले. रेणुकाचार्य नेहमीच काँग्रेस नेत्याच्या ट्विटची खिल्ली उडवत असतात.
कर्नाटकात सध्या हिजाबवरून वाद सुरू आहे. कर्नाटकातील उडपी जिल्ह्यात यासाठी विद्यार्थिनींनी आंदोलन केले होते. त्याचबरोबर न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने हिजाब बंदी घटनात्मक ठरविली आहे.