कोरोना विषाणूला भारतीय व्हेरिएंट म्हणणारे खासदार शशी थरुर यांनी देशाची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे.BJP leader demands cancellation of Lok Sabha membership of Shashi Tharoor
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना विषाणूला भारतीय व्हेरिएंट म्हणणारे खासदार शशी थरुर यांनी देशाची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे.
काँग्रेस खासदार आणि आयटी समितीचे सदस्य असलेल्या शशी थरूर यांना आयटी समिती सदस्य पदावरून हटवण्यासह त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निशिकांत दुबे यंनी केली आहे. यासाठी त्यांनी लोकसभा सभापती ओम बिरला यांना पत्र लिहीले आहे.
घटनेतील दहाव्या अनुसूचीतील नियमांचा संदर्भ त्यांनी दिला आहे.दुबे यांनी म्हटले आहे की, शशी थरूर यांच्यामुळे संसद आणि भारताच्या प्रतिमेला तडा गेला आहे. करोना विषाणूच्या व्हेरियंटला भारताचं नाव ते वारंवार देत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनं याचं नाव इ.1.617 असं दिलं आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेल्या शब्दामुळे भारताची प्रतिमा डागाळत आहे. भारत सरकारने या शब्दावर आक्षेप घेतला आहे. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी केली आहे.
असं असूनही थरून वारंवार या शब्दाचा वापर करताना दिसत आहेत.वर कराम करत असल्याचा आरोप करून निशिकांत दुबे म्हणाले, टूलकिटप्रकरणी आयटी मंत्रालयाकडून ते स्पष्टीकरण मागत आहे.
ट्विटर देशाविरोधात कारवाई करत असताना स्पष्टीकरण मागणं चुकीचं आहे. हे प्रकरण तपास यंत्रणांकडे आहे. आयटी समिती सरकारच्या कारवाईत दखल देऊ शकत नाही.
BJP leader demands cancellation of Lok Sabha membership of Shashi Tharoor
महत्त्वाच्या बातम्या
- कोव्हॅक्सिन टोचल्याने परदेश प्रवासावर गदा, पण ही आहे गुड न्यूज
- माजी गृहमंत्री देशमुख यांच्या निकटवर्तियांवर नागपुरात ईडीचे छापे, मुंबईत जयस्वाल नडण्याची चिन्हे
- फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरचा भारतातील बाजार उठणार ?
- RBI Guideline : जिल्हा मध्यवर्ती बँकांचा राज्य सहकारी बँकेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा, राज्य सरकारची शिफारस गरजेची
- डाळींच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल, राज्यांना दिले ‘हे’ निर्देश
- महाराष्ट्र पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या : जयजितसिंग यांच्या जागी आयपीएस अधिकारी विनीत अग्रवाल हे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख