BJP leader Ashwini Upadhyay arrested : देशाची राजधानी दिल्लीतील जंतर -मंतर येथे निदर्शनादरम्यान झालेल्या प्रक्षोभक घोषणाबाजीचा मुद्दा गंभीर बनला आहे. मंगळवारी मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांनी भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांना अटक केली आहे. अश्विनी उपाध्याय यांच्याव्यतिरिक्त विनोद शर्मा, दीपक सिंग, दीपक, विनीत क्रांती, प्रीत सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे. प्रीत सिंह सेव्ह इंडिया फाउंडेशनचे संचालक आहेत, त्यांच्या बॅनरखाली 8 ऑगस्ट रोजी जंतर -मंतर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. BJP leader Ashwini Upadhyay arrested in Connection with Communal sloganeering at Jantar Mantar
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील जंतर -मंतर येथे निदर्शनादरम्यान झालेल्या प्रक्षोभक घोषणाबाजीचा मुद्दा गंभीर बनला आहे. मंगळवारी मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांनी भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांना अटक केली आहे. अश्विनी उपाध्याय यांच्याव्यतिरिक्त विनोद शर्मा, दीपक सिंग, दीपक, विनीत क्रांती, प्रीत सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे. प्रीत सिंह सेव्ह इंडिया फाउंडेशनचे संचालक आहेत, त्यांच्या बॅनरखाली 8 ऑगस्ट रोजी जंतर -मंतर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिल्ली पोलीस मंगळवारी सकाळपासून या सर्वांची चौकशी करत आहेत, तर गुन्हे शाखाही याप्रकरणी सक्रिय आहे. घोषणा देणाऱ्या पिंकी चौधरीचा दिल्ली पोलीस अजूनही शोध घेत आहेत.
अश्विनी उपाध्याय यांची चौकशी
काल रात्री कॅनॉट प्लेस पोलीस स्टेशनमध्ये चौकशीपूर्वी अश्विनी उपाध्याय यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आम्ही पोलिसांना सांगायला आलो आहोत की, या कार्यक्रमाचे आयोजक सेव्ह इंडिया फाउंडेशन होते, आम्ही त्यांना ओळखत नाही. बरेच लोक तिथे गेले होते, म्हणून मीही गेलो होतो. कार्यक्रम तासभर चालला, पोलिसांनी आम्हाला रोखल्यावर आम्ही निघालो.
अश्विनी उपाध्याय म्हणाले की, व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे, जर ती खरी असेल तर त्यावर कारवाई केली पाहिजे. जर व्हिडीओ बनावट असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. आमचा दोष एवढाच आहे की, आम्ही भारत छोडो दिवस साजरा करण्यासाठी, इंग्रजांच्या कायद्यावर आक्षेप घेण्यासाठी गेलो होतो.
अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले की, त्यांनी हा व्हिडिओ अनेक वेळा पाहिला आहे, पण लोकांचा शोध लागला नाही. पोलिसांनी याची चौकशी करून त्यावर कारवाई करावी. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, सध्या अटक होणार नाही, चौकशी केली तर आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू. अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले की, त्यांची तब्येत चांगली नाही, परंतु पोलिसांच्या सांगण्यावरून ते आले आहेत.
वकील अश्विनी उपाध्याय म्हणाले की, जर या देशातील निष्पाप लोकांना न्यायालयात जावे लागले आणि पोलीस ठाण्याकडून न्याय मिळाला नाही, तर ही मोठी शोकांतिका आहे. कायदा निकृष्ट असल्याने त्या घोषणा दिल्या जात आहेत. जर कायदा कठोर झाला असता आणि गेल्या 20 वर्षांत 4 लोकांना तुरुंगात पाठवले गेले असते, तर कदाचित अशा घोषणा दिल्या गेल्या नसत्या.
अश्विनी उपाध्याय यांनी पुढे निशाणा साधत म्हटले की, एखादी व्यक्ती म्हणते की 20 मिनिटांत तो भारतातील हिंदूंना संपवेल, तो आज तुरुंगात नाही, तर विधानसभेत बसला आहे. म्हणूनच लोकांना प्रेरणा मिळतेय की, असे केल्यानेच त्यांना प्रसिद्धी मिळेल आणि ते आमदार होऊ शकतील.
BJP leader Ashwini Upadhyay arrested in Connection with Communal sloganeering at Jantar Mantar
महत्त्वाच्या बातम्या
- UNSC open debate; चीन-अमेरिका भिडले; दक्षिण चीन समुद्रात 13 दशलक्ष चौरस मैल प्रदेशावर चीनचा बेकायदा दावा; चीन exposed…!!
- भाजपकडून महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली? पाहा काय म्हणाले रावसाहेब दानवे!
- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आता थेट गृहमंत्री अमित शहांवरच आरोप, राजकीय संघर्ष संपेना
- आता लडाखमध्ये बांधले जाणार केंद्रीय विद्यापीठ, राज्यसभेने आवाजी मतदानाने विधेयकाला दिली मंजुरी
- स्वातंत्र्यदिनी पीएम मोदींना लाल किल्ल्यावर झेंडा फडकवू न देणाऱ्यास ७.४५ कोटींचे इनाम, प्रतिबंधित सीख फॉर जस्टिस संघटनेची घोषणा