• Download App
    संसदेत उद्या आणि परवा हजेरीसाठी भाजपचा सर्व खासदारांना व्हीप; मोदी सरकार महत्त्वाची विधेयके मांडणार BJP issues three-line whip to its Lok Sabha MPs asking them to be present in the House tomorrow

    संसदेत उद्या आणि परवा हजेरीसाठी भाजपचा सर्व खासदारांना व्हीप; मोदी सरकार महत्त्वाची विधेयके मांडणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उद्या ता. 10 ल परवा ता. 11 या दोन्ही दिवशी संसदेत हजर राहण्यासाठी सत्ताधारी भाजपने आपल्या सर्व खासदारांना व्हीप बजावला आहे. याचा अर्थ उद्या आणि परवा अत्यंत महत्त्वाची विधेयके संसदेत मांडण्यात येणार आहेत. BJP issues three-line whip to its Lok Sabha MPs asking them to be present in the House tomorrow

    आज दुपारी राज्यसभेच्या भाजपच्या सर्व खासदारांना हजेरी लावण्याचा व्हीप बजावण्यात आला, तर सायंकाळी लोकसभेच्या खासदारांना सदनात हजेरी लावण्यासंबंधी व्हीप बजावण्यात आला. हे दोन्ही व्हीप फक्त तीन ओळींचे आहेत.

    संसदेत महत्त्वाची विधेयके मांडताना सर्व पक्ष आपापल्या भूमिकेनुसार खासदारांना व्हीप बजावत असतात. त्यानुसार भाजपने सरकारला हवे ती विधेयके संमत करून घेण्यासाठी हे व्हीप बजावल्याचे स्पष्ट होत आहे. 2019 पासून सलग दोन पावसाळी अधिवेशनांमध्ये महत्त्वाची विधेयके संमत करण्यात आली आहेत.

    5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीर मधून 370 कलम रद्द करण्याचे तसेच 35 अ रद्द करण्याचे महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यात आली. तसेच तीन तलाक विरोधी विधेयक ही पावसाळी अधिवेशनात पाच ऑगस्ट रोजी 2018 मध्ये मंजूर करण्यात आले. उद्या 10 ऑगस्ट 2021 रोजी अशाच प्रकारची महत्त्वाची विधेयके मोदी सरकार मांडणार आहे.

    विरोधकांनी गेले दोन आठवडे पेगासस हेरगिरी तसेच कृषी कायदे या मुद्द्यांवरून दररोज गोंधळ घालून संसदेचे कामकाज बंद पाडले. सरकारने करविषयक विधेयक राज्यसभेत चर्चेअंती मंजूर करून घेतले आहे. आता लोकसभेत या विधेयकावर चर्चा होईल.

    महत्वाच्या अर्थविषयक विधेयकावर सरकारचा पराभव होण्याने सरकारला राजीनामा द्यावा लागतो. अर्थात मोदी सरकारची दोन्ही सभागृहांमध्ये अशी
    परिस्थिती नाही. दोन्ही ठिकाणी मोदी सरकारला भक्कम बहुमत आहे. परंतु, खासदार योग्य आणि आवश्यक वेळेला हजर राहणे हे सरकारसाठी महत्वाचे आहे. म्हणून हे व्हीप बजावण्यात आले आहेत.

    BJP issues three-line whip to its Lok Sabha MPs asking them to be present in the House tomorrow

    Related posts

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!