विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतातील निवडणूक निकालांचा अंदाज सर्वात प्रथम सट्टा बाजाराला येतो असे म्हणतात. पाच राज्यांच्या निवडणुकांत सट्टा बाजारात भाजपाच्या नावाने सर्वाधिक बोली आहे. सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपा मोठ्या विजयाच्या दिशेने जात आहे. दुसरे मोठे राज्य असलेल्या आसाममध्ये भाजपावर कोणी सट्टाच लावायला तयार नाही कारण येथे कॉँग्रेस स्पर्धेतच नसल्याने भाजपाचा विजय शंभर टक्के मानला जात आहे. तमीळनाडूमध्ये मात्र द्रुमुक- कॉंग्रेस आघाडी निर्विवाद विजय मिळविण्याची शक्यता आहे. केरळातही डावी आघाडीचा विजय निश्चित मानला जात आहे. BJP in the betting market, most bets on BJP in West Bengal, Congress not in Assam
निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांवर किमान २५ हजार कोटी रुपयांचा सट्टा लागणार आहे. पाच राज्यापैैकी तीन राज्यांमध्ये भाजपाच सत्ता मिळवेल असा बुकींचा विश्वास आहे.
संपूर्ण देशात पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांची उत्सुकता आहे. भाजपाने तृणमूल कॉँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या सभांना वातावरण गरम झाले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपावर कोट्यवधी रुपयांची बोली लागली आहे.
भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित मानला जात आहे. २९४ सदस्यसंख्येच्या विधानसभेत तृणमूल कॉँग्रेस ११५ ते १२० जागांच्यावर जाऊ शकणार नाहीत. भाजपाने १४० जागा मिळविल्यास दर २२ पैैसे आहे. याचा अर्थ एखाद्याने १ रुपया भाजपाने १४० जागा जिंकणा असा अंदाज करून लावला असेल तर त्याला १ रुपया २२ पस्ैो मिळतील. पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी १४७ जागा जिंकणे गरजेचे आहे.
भाजपाने १४५ जागा मिळविल्यास हाच रेट ६२ पस्ैो झाला आहे. म्हणजे १४५ जागा मिळाल्यास १ रुपयावर ६२ पस्ैो मिळणार आहे. भाजपा १५० पेक्षा जास्त जागा मिळविणार असेच सट्टा बाजाराचे मत आहे. कारण भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकण्यावरचा रेट एक रुपया आहे. म्हणजे भाजपा १५० पेक्षा जास्त जागा मिळविणार असल्याचा अंदाज बरोबर आला तरी एक रुपयावर एक रुपयाच मिळणार आहे. दुसऱ्या बाजुला तृणमूल कॉँग्रेसने ११५ जागा मिळविणा असे बेटींग कोणी केल्यास त्याचा रेट १.३० रुपये इतका आहे. बुकींकडून तृणमूलला यापेक्षा जास्त जागा मिळणार नाही, असाच अंदाज व्यक्त केला जात आहे.
केवळ एका महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये २० सभा होत आहेत. अमित शहा ५० पेक्षा जास्त सभा घेत आहे. त्यामुळे वातावरण भाजपाच्या बाजुने इतके भारून गेले आहे की तृणमूलवर पैैसे लावणे म्हणजे सर्वस्व गमावणे आहे, असे बुकींना वाटत आहे. आसाम आणि पुडुच्चेरीमध्ये कॉँग्रेस स्पर्धेतच नाही. त्यामुळे या राज्यांत भाजपावरच पैैसे लागले आहे.
तमीळनाडूमध्ये मात्र द्रुमुक- कॉँग्रेस आघाडी निर्विवाद विजय मिळवेल. तसेच केरळमध्ये डावी आघाडीच सत्तेवर येईल असा विश्वास बुकींना वाटत आहे.
BJP in the betting market, most bets on BJP in West Bengal, Congress not in Assam
महत्वाच्या बातम्या
- चिकित्सक , डॉक्टरांच्या भरतीसाठी पुणे जिल्हा परिषदेकडून बंपर ऑफर
- सावधान ! घसा कोरडा पडणे, डोकेदुखी ही कोरोनाची नवी लक्षणे , दुसरी लाट तरुणांसाठी धोकादायक ; खबरदारी घेण्याचा तज्ज्ञाचा सल्ला
- इंजेक्शनचा नाही दारूचा अधिक फायदा ; दिल्लीतील महिलेचा व्हिडिओ व्हायरल
- एसटी महामंडळ ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी सरसावले ; परराज्यातून चालक आणणार टँकर
- सराफाकडे गृहमंत्रालयाच्या नावाखाली पाच लाख रुपयांची मागितली खंडणी ,पोलीस निरीक्षकावर आरोप ; बार्शीतील घटनेमुळे खळबळ