वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना भाजपने पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारले आहे. त्यांना दुसऱ्या जागेची ऑफर दिली आहे, अशी माहिती भाजपचे गोवा प्रभारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. BJP denies Utpal Parrikar ticket from Panaji; Second place offer
उत्पल पर्रीकर हे भाजप परिवारातला हिस्सा आहेत पर्रीकर परिवाराचा भाजपने कायम सन्मान केला आहे. त्यांना दोन पर्यायी जागांची ऑफर भाजपने दिली होती. त्यापैकी एका जागेवरून लढण्यास त्यांनी स्वतः नकार दिला आहे. दुसऱ्या जागेवरून लढण्यासाठी त्यांचे मन वळवले जात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
पणजी या मनोहर पर्रीकर यांच्या मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात यांना भाजपने तिकीट जाहीर केले आहे. आता भाजपच्या ऑफर नुसार उत्पल पर्रिकर हे पणजी सोडून दुसऱ्या जागेवरून निवडणूक लढवणार की ते पणजी मतदारसंघ राखून अन्य कोणत्या पक्षांची ऑफर स्वीकारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.