• Download App
    मुख्यमंत्री बदलत भाजप जुन्या जातीय समीकरणाच्या दिशेने; मग मोदी - शहा यांचे वैशिष्ट्ये काय उरले??। BJP changing CM towards old caste equation; So what are the features of Modi-Shah left ??

    मुख्यमंत्री बदलत भाजप जुन्या जातीय समीकरणाच्या दिशेने; मग मोदी – शहा यांचे वैशिष्ट्ये काय उरले??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलताना भूपेंद्र पटेल यांच्या रूपाने पाटीदार समुदायाच्या नेत्याला मुख्यमंत्री केल्याने भाजप जुन्या जातीय समीकरणांच्या राजकारणाला बळी पडल्याची टीका राजकीय विश्लेषण करू लागले आहेत. BJP changing CM towards old caste equation; So what are the features of Modi-Shah left ??

    राज्यांमध्ये प्रबळ आणि प्रभावी जातींच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचे आणि उतरवायचे ही काँग्रेसच्या राजकारणाची जुनी स्टाइल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या जातीय राजकारणाला छेद देण्याचा मध्यंतरी प्रयत्न केला होता. त्यामध्ये ते पाच ते सात वर्षे यशस्वी झाले. हरियाणात मनोहर लाल खट्टर, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने तसेच झारखंडमध्ये रघुबर दास यांच्या रूपाने अनुक्रमे जाट, मराठा आणि आदिवासी नसलेल्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदी बसवून त्यांची कारकीर्द पूर्ण करून दिली. परंतु आता मोदी आणि शहा यांना देखील जातीय समीकरण पुढे झुकणे भाग पडल्याचे टीका राजकीय विश्लेषक करीत आहेत.



    कारण गुजरातमध्ये गेल्या वीस वर्षांपासून पाटीदार मुख्यमंत्री नाही. भूपेंद्र पटेल यांच्या रूपाने मोदी आणि शहा यांनी पाटीदार मुख्यमंत्री दिला आहे. तसेच कर्नाटकात बसवराज बोम्मई यांच्या रूपाने लिंगायत समुदायाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसविले आहे. त्यामुळेच त्यांच्यावर जुन्या जातीय समीकरण यांना बळी पडल्याची टीका होते आहे. अशा स्थितीत भाजपचे वैशिष्ट्ये काय उरले? ते जुन्याच काँग्रेसी वळणाने चालले आहेत, अशीही टीका आहे.

    परंतु भाजपच्या अंतर्गत सूत्रांच्या म्हणण्यानुसार भूपेंद्र पटेल यांना निवडून मोदींनी प्रथमच आमदार झालेल्या नेत्याला निवडून प्रस्थापित पाटीदार नेत्यांना शह दिल्याचे स्पष्ट होत आहे. कोणत्याही समुदायाला वगळण्याचा हा मुद्दा नाही किंवा त्याच्या प्रभावाला नाकारण्याचाही मुद्दा नाही. भाजप संघटनेच्या दृष्टीने आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील. तसाच निर्णय भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री नेमताना झाला आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

    BJP changing CM towards old caste equation; So what are the features of Modi-Shah left ??

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!