• Download App
    करहालमधील पराभवाची भीतीने अखिलेशना ग्रासलेय, भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेलांनी मतदानापूर्वी टोचले BJP candidate Union Minister S. P. Singh Baghela was stabbed before voting

    करहालमधील पराभवाची भीतीने अखिलेशना ग्रासलेय, भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेलांनी मतदानापूर्वी टोचले

    वृत्तसंस्था

    लखनौ : उत्तर प्रदेशातला सर्वांत हाय प्रोफाइल मतदारसंघ करहालमध्ये उद्या रविवारी मतदान होत आहे, त्यापूर्वी करहालमधील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल यांनी माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना खोचक शब्दांमध्ये टोचून घेतले आहे. BJP candidate Union Minister S. P. Singh Baghela was stabbed before voting

    अखिलेश यादव यांना करहाल मधून आपल्या पराभवाच्या भीतीने ग्रासले आहे. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांमध्ये आक्रस्ताळी वक्तव्ये करताना दिसलेत. एवढेच नाही, तर ज्या पिताजींचा त्यांनी वारंवार अपमान केला, त्या मुलायम सिंह यादव यांना वृद्धापकाळात देखील त्यांनी प्रचारात उतरणे भाग पाडले. खरे म्हणजे वृद्धापकाळात मुले आपल्या वडिलांना आधार देत असतात. पण इकडे उलटी गंगा वाहतेय. मुलगाच आपले राजकीय अस्तित्व वाचविण्यासाठी आपल्या वृद्ध वडिलांची मदत मागतोय, असा टोला एस. पी. सिंह बघेल यांनी अखिलेश यादव यांना लगावला.

    अखिलेश यादव यांना खरेतर करहाल मतदारसंघ स्वतःच्या निव़डून पश्चाताप झाला आहे. सुरवातीला त्यांनी भाजपसमोर मोठे आव्हान उभे करीत असल्याचा आव आणला खरा, पण आता मतदानाच्या आधीच त्यांना पराभव दिसू लागला आहे. किंबहुना पराभवाच्या भीतीने त्यांना ग्रासले आहे, असे टीकास्त्र बघेल यांनी सोडले आहे.

    उद्या करहालमध्ये मतदान होते आहे. य़ा पार्श्वभूमीवर एस. पी. सिंह बघेल यांनी अखिलेश यादव यांच्यावर मर्मभेदी बाण सोडून घेतला आहे. समाजवादी पक्षाने अद्याप त्यांना प्रत्युत्तर दिलेले दिसत नाही.

    BJP candidate Union Minister S. P. Singh Baghela was stabbed before voting

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य