• Download App
    यूपी सोडण्याच्या वक्तव्यावर मुनव्वर राणा यांना भाजपचे प्रत्युत्तर, दुसरे राज्य शोधा, कारण पुन्हा येणार योगी सरकार! । bjp answer to munawwar rana you should find another place yogi is coming again

    यूपी सोडण्याच्या वक्तव्यावर मुनव्वर राणा यांना भाजपचे प्रत्युत्तर, दुसरे राज्य शोधा, कारण पुन्हा येणार योगी सरकार!

    BJP Answer To Munawwar Rana : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी योगी पुन्हा यूपीचे मुख्यमंत्री झाले तर राज्य सोडून देण्याचे विधान केले होते. यावर आता भाजपने पलटवार केला आहे. भाजप प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले, मुनव्वर राणा यांनी आता दुसरे एक शहर किंवा राज्य शोधायला हवे, कारण 2022 मध्ये योगीच पुन्हा येणार आहेत. त्रिपाठी म्हणाले, राणा राजकारणाला धार्मिक रंग देण्याचे काम करत आहेत. bjp answer to munawwar rana you should find another place yogi is coming again


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी योगी पुन्हा यूपीचे मुख्यमंत्री झाले तर राज्य सोडून देण्याचे विधान केले होते. यावर आता भाजपने पलटवार केला आहे. भाजप प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले, मुनव्वर राणा यांनी आता दुसरे एक शहर किंवा राज्य शोधायला हवे, कारण 2022 मध्ये योगीच पुन्हा येणार आहेत. त्रिपाठी म्हणाले, राणा राजकारणाला धार्मिक रंग देण्याचे काम करत आहेत.

    मुनव्वर राणा यांनी नुकतेच म्हटले होते की, जर योगी आदित्यनाथ पुन्हा यूपीमध्ये मुख्यमंत्री झाले तर मी राज्य सोडून देईन आणि हे राज्य मुस्लिमांना राहण्यास योग्य नाही हेही मी मान्य करेन. यूपीमध्ये ओवैसी यांच्या पक्षाने निवडणूक लढवण्यावर मुनव्वर राणा म्हणाले की, भाजप आणि एआयएमआयएम हे दोन्ही पक्ष केवळ दाखवण्यासाठी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवत आहेत. दोघांनाही धार्मिक आधारावर राज्यातील मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे.

    नव्या लोकसंख्या धोरणावर टीका

    उत्तर प्रदेशच्या नवीन लोकसंख्या धोरणाबद्दल राणा यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, जर मुख्यमंत्री योगी विवाहित असते, तर त्यांनी लोकसंख्या कायदा आणण्यापूर्वी विचार केला असता.

    यूपी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न

    मुनव्वर राणा म्हणाले, चकमकीत मुस्लिम मुले ठार मारली जात आहेत. अल कायदाच्या नावावर बनावट प्रकरणे बनत आहेत. यूपीमधील मुस्लिमच जर कायद्याने जगू शकलत नाहीत तर अल कायदा काय जगेल? एवढेच नव्हे तर ते म्हणाले, मी गुप्तहेर एजन्सीवरही प्रश्न उपस्थित करतो की निरपराध लोकांना का अडचणीत आणले जाते. घरातून कुकर उचलून त्याला बॉम्ब म्हटलं जात आहे.

    ओवैसींना मुस्लिम मतदान करणार नाहीत

    मुनव्वर राणा म्हणाले, ओवैसी यांच्या पक्षाने निवडणुका लढवून केवळ भाजपला फायदा होईल. ते म्हणाले की, जर उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाजात काही बुद्धिमत्ता असेल तर ते ओवैसी यांना मतदान करणार नाहीत. कशाही तऱ्हेने मुस्लिमांना त्रास देणे हे भाजपा सरकारचे एकमेव काम आहे. धर्मांतर कायदा असो वा लोकसंख्या नियंत्रण कायदा असो किंवा दहशतवादाच्या नावाखाली अटक असो.

    bjp answer to munawwar rana you should find another place yogi is coming again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!