• Download App
    Bipin Rawat : सीडीएस बिपीन रावत यांचं पार्थिव आज मिलिट्री विमानाने दिल्लीला आणणार ; उद्या अंत्यसंस्कार । Bipin Rawat: CDS Bipin Rawat's body to be brought to Delhi by military plane today; Funeral tomorrow

    Bipin Rawat : सीडीएस बिपीन रावत यांचं पार्थिव आज मिलिट्री विमानाने दिल्लीला आणणार ; उद्या अंत्यसंस्कार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत देशाचे माजी लष्करप्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात दुर्घटनाग्रस्त झाले. Bipin Rawat: CDS Bipin Rawat’s body to be brought to Delhi by military plane today; Funeral tomorrow

    देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका (Madhulika) यांच्या पार्थिवावर शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. जनरल जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचे पार्थिव गुरुवारी म्हणजे आज मिलिट्री विमानाने (Military Aircraft) दिल्लीला आणण्यात येणार आहे.



    सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव शुक्रवारी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यासाठी ठेवले जाईल. त्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी केली जाणार आहे. दिल्लीच्या कॅन्टॉन्मेंटमधील (Delhi Cantonment) ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत (Brar Square Cemetery)त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील.

    Bipin Rawat : CDS Bipin Rawat’s body to be brought to Delhi by military plane today; Funeral tomorrow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!