विशेष प्रतिनिधी
इंदूर : बनावट गुणपत्रिका तयार करून पाचशेहून अधिक जणांना बनावट पदवी दिल्याचा प्रकार इंदूरमध्ये उघडकीस आला आहे. या माध्यमातून त्याने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. केवळ मध्य प्रदेशच नव्हे तर मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान शिक्षण मंडळासह विविध विद्यापीठांच्या बनावट गुणपत्रिका तयार करण्याचा त्याचा धंदा होता.Billions earned by fake marksheets , fake degrees given to more than five hundred people
सतीश गोस्वामी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या कार्यालयातून सहा कॉम्प्युटर, दोन प्रिंटर आणि चौदा बनावट गुणपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गुरुप्रसाद पाराशर यांनी सांगितले. चार-पाच वर्षांपासून त्याचा हा धंदा सुरू होता.
एका सॉफ्टवेअरच्या मदतीने तो बनावट गुणपत्रिका तयार करायचा. त्या मोबदल्यात तो विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम वसूल करून दहावी, बारावीसह विविध विद्यापीठांच्या गुणपत्रिका द्यायचा.५५४ लोकांची नोंदणी असलेल्या दोन नोंदवह्या आढळल्या आहेत
या टोळीकडून लोकांना बनावट गुणपत्रिका मिळाल्या असाव्यात. या टोळीतील इतर लोकांना आणि या टोळीकडून बनावट गुणपत्रिका घेणाऱ्यांना पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
Billions earned by fake marksheets , fake degrees given to more than five hundred people
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेस दहशतवादाची जननी, नेहरूंचा रामावर विश्वास, इंदिराजींनी संतांवर गोळीबार केला तर सोनियांनी रामाचे अस्तित्व नाकारले, योगी आदित्यनाथांचा आरोप
- अफगणिस्थानचे माजी उपराष्ट्रपती सालेह यांच्या घरात सोन्याच्या वीटा, डॉलर्सच्या बंडलासह सापडले ४८ कोटी, तालीबानचा दावा
- किरण रिजीजू यांची धडाकेबाज कामगिरी पाहून सरन्यायाधिश म्हणाले, मला वाटले ते तर ऑक्सफोर्डमध्ये शिकलेत, नंतर समजले गावातील शाळेत घेतले शिक्षण
- इन्फोसिससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी