वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : कोरोनासारख्या आणखी एक महामारीचा जगाला विळखा बसणार आहे, असा इशारा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे. ते म्हणाले, कोरोना लसीकरणामुळे त्या विरोधी प्रतिकारशक्ती जनतेत तयार झाली आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट नाहीसे झाले आहे. Bill Gates warn another pandemic may hit the world soon
भविष्यात येणारी महामारी ही कोरोनाच्या प्रकारातील एका वेगळ्या व्हायरसपासून येऊ शकते. मात्र, वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीच्या मदतीने जग त्यावर मात करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी आतापासूनच गुंतवणूक करावी लागेल. कोरोना दोन वर्षांपासून आपल्यामध्ये आहे आणि त्याचा वाईट परिणाम आता कमी होत आहे, ही बाब दिलासादायक असल्याचे त्यांनी सांगितलं.
ओमीक्रॉन व्हेरियंटमुळे व्हायरसची तीव्रताही कमी झाली आहे. व्हायरस पसरतो तेव्हा तो स्वतःची प्रतिकारशक्ती निर्माण करतो. पण आता जागतिक समुदायाची व्हायरसविरोधातील प्रतिकारशक्ती वाढल्याने ही सवय लसीपेक्षा अधिक प्रभावी ठरली आहे, असं बिल गेट्स म्हणाले.
Bill Gates warn another pandemic may hit the world soon
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची चाकू मारून हत्या; हिजाबविरोधात फेसबुकवर पोस्ट लिहिल्याने संताप; अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला
- समाजवादी पक्षाची रडारड अतापासूनच सुरू, निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यापासून ईव्हीएम मशीनवर आरोप सुरू
- बहिणीच्या प्रचाराला गेलेल्या सोनू सूदवर पोलीसांची कारवाई, कारही केली जप्त
- पंतप्रधानांनी भर सभेत कार्यकर्त्याचे धरले पाय, पाहायला मिळाले वेगळेच रुप
- लालूप्रसाद पुन्हा तुरुंगात जाणार का? चारा घोटाळ्याच्या संदर्भातील पाचव्या गुन्ह्यावर सोमवारी निकाल