विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : भारताच्या कोरोना लस कार्यक्रमाचे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केलेले आहे. कोरोनाची लस परवडणाºया किंमतीत जगातील इतर देशांना दिल्याबद्दल भारतीय उत्पादकांचीदेखील प्रशंसा केलेली आहे.Bill Gates praised India’s vaccination program
भारत-अमेरिका आरोग्य भागीदारीसंदर्भात भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या आभासी बैठकीत बिल गेट्स बोलत होते. बिल गेट्स म्हणाले की, मागील वर्षभरात भारताने शेजारील १०० देशांमध्ये १५० दशलक्ष कोरोना डोस वितरीत केले. त्यामुळे भारतातील कोरोना लस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना धन्यवाद.
सध्या जगातील सर्व देशांमध्ये मुलांचे न्युमोनिया आणि रोटाव्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी लस दिल्या जात आहेत. जगाला परवडणाºया लसी उपलब्ध करून देण्यासाठी द्विपक्षीय भागीदारीचा फायदा घेत भारत आणि यूएसमधील प्रमुख भागधारकांना एकत्र आणण्यासाठी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
महामारी अजून संपलेली नसताना आपण वर्तमानातील आपतकालीन परिस्थितीच्या पलिकडे पाहण्यास सुरूवात केलेली आहे. याच अर्थ असा की, आपण केवळ कोरोनावर नियंत्रण मिळवत नाही तर भविष्यात साथींचा रोगांचा उद्रेकच होणार नाही आणि संसर्गजन्य रोगांना लढा देण्यासाठी तयार आहे, असंही बिल गेट्स यांनी परिषदेत सांगितले.
बिल गेट्स म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्यासंदर्भात दृढतेबद्दल बोलले आहेत. त्यासाठी भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रतिभेचा वापर करून नवी वैज्ञानिक शोध आणि नवी उत्पादननिर्मितीचा आधार घेतला जाईल.
याद्वारे जगाच्या आरोग्याची आम्ही वचनबद्ध आहोत, असं मोदी बोलले आहेत. आजची भागिदारी ही आपली सामुहिक महत्त्वाकांक्षा आहे. या भागीदारीत कोव्हॅक्सीन, कार्बोव्हॅक्स आणि कोविशिल्ड या तीन लसी या भागिदारीची उत्पादने आहेत.