• Download App
    बिलावल पाठोपाठ पाकिस्तानी महिला मंत्री बरळली; भारताला अणुबाँब हल्ल्याची धमकी Bilawal was followed by Pakistan's women's minister; Nuclear bomb attack threat to India

    बिलावल पाठोपाठ पाकिस्तानी महिला मंत्री बरळली; भारताला अणुबाँब हल्ल्याची धमकी

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बहकून झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला असतानाच पाकिस्तानी महिला मंत्री पण बरळली आहे. Bilawal was followed by Pakistan’s women’s minister; Nuclear bomb attack threat to India

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातचा कसाई म्हणत बिलावल भुट्टो यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर आता पाकिस्तानची आगपखड सुरूच असल्याचं दिसतंय. पाकिस्तानच्या महिला मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केलंय.



    पाकिस्तानच्या मंत्रीमंडळातील महिला मंत्री शाजिया मर्री यांनी भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे. बिलावल भुट्टो यांच्या समर्थनार्थ जिया मर्री यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमचं न्यूक्लिअर स्टेटस शांत राहण्यासाठी नाही, असं म्हणत त्यांनी थेट भारताला धमकी दिली आहे.

    आम्ही भारताविरोधात कोणती तक्रार करत नाही. आमची तक्रार ही भारतामधील नरेंद्र मोदी सरकार यांच्याविरोधात आहे. भारत नेहमी पाकिस्तानवर आरोप करतो. परंतु पाकिस्तान हे गुपचूप सहन करणार नसल्याचं वक्तव्य शाजिया मर्री यांनी केलंय. त्यानंतर आता भारतीयांमध्ये संतप्त वातावरण पहायला मिळत आहे.

    दरम्यान, बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारलं होतं. जर तुम्ही तुमच्या घराच्या मागं साप ठेवला तर तो फक्त शेजारीच नाही तर तुमच्या घरातील लोकांनाही चावेल, असं जयशंकर म्हणाले होते. त्यानंतर आता पाकिस्तानकडून वादग्रस्त सुरूच आहे.

    Bilawal was followed by Pakistan’s women’s minister; Nuclear bomb attack threat to India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!