वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : दहशतवाद आणि ओसामा बिन लादेनला पोसल्याबद्दल भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत जोरदार थप्पड खाल्ल्यानंतर पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो अक्षरशः पिसाटला आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख गुजरातचा कसाई असा केला आहे. bilawal bhutto speak about narendre modi
बिलावल भुट्टोच्या तोंडची ही भाषा थेट सोनिया गांधींच्या मौत के सौदागर या भाषेशी जुळणारी आहे. बिलावल भुट्टो हा पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा पुत्र आहे, पण तो काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या राजकीय वारस असल्यासारखा बोलला आहे. सोनिया गांधींनी 2007 च्या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करताना सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम मध्ये त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा उल्लेख मौत के सौदागर असा केला होता, तर आज 16 डिसेंबर 2022 रोजी बिलावल भुट्टोने मोदींचा उल्लेख गुजरातचा कसाई असा केला आहे.
संयुक्त राष्ट्र समितीच्या सुरक्षा समितीची बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्र संघात झाली त्याचे अध्यक्षस्थान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भूषविले होते. या सुरक्षा समितीचा पाकिस्तान हा ही सदस्य देश आहे. त्या बैठकीच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या वतीने बोलताना त्यांचा परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो याने भारताला दहशतवाद रोखण्यासंबंधी उपदेश केला होता. त्या उपदेशाला प्रत्युत्तर देताना जयशंकर यांनी दहशतवाद पोसणाऱ्या आणि ओसामा बिन लादेनला आश्रय देणाऱ्यांनी आम्हाला दहशतवाद रोखायला शिकवू नये, असे जोरदार प्रस्तुतर दिले होते.
या प्रत्युत्तराने बिलावल भुट्टो चांगलाच पिसाटला आणि आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याने, ओसामा बिन लादेन मेला पण गुजरातचा कसाई अजून जिवंत आहे आणि सध्या तो भारताचा पंतप्रधान आहे. भारतात महात्मा गांधींच्या विचारांचे राज्यकर्ते नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर हिटलरच्या प्रेरणेतून जन्माला आला आहे. हेच ते भारताचे पंतप्रधान आहेत जे पंतप्रधान होण्यापूर्वी अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला होता, अशी मुक्ताफळे बिलावल भुट्टोने उधळली आहेत.
बिलावल हा त्याचे आजोबा झुल्फिकार अली भुट्टो यांनी स्थापन केलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचा अध्यक्ष आहे. त्याचे वडील असीफ अली झरदारी हे मिस्टर 10% म्हणून पाकिस्तानात ओळखले जातात. ते पाकिस्तानचे अध्यक्षही होते आणि बिलावल सध्याच्या शहाबाज शरीफ मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध गुजरातचे कसाई असा उल्लेख केला आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार पडसाद उलटायला सुरुवात झाली आहे.
bilawal bhutto speak about narendre modi
महत्वाच्या बातम्या