वृत्तसंस्था
पाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेऊन तेजस्वी यादव यांच्याबरोबर नवा राजकीय घरोबा केला. त्याचे पडसाद मणिपूरमध्ये उमटले असून मणिपूरमध्ये नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल जेडीयू फुटला आहे. जेडीयूचे 6 आमदार त्यांच्या पक्षातून बाहेर पडून भाजपच्या गोटात सामील झाले आहेत. Bihar’s failure splits Nitish Kumar’s JDU in Manipur
या मुद्द्यावर नितीश कुमार यांनी भाजपला घेरले आहे. भाजप दुसऱ्या पक्षांमध्ये फाटाफूट घडवून असंवैधानिक पत्र कृत्य करतो आहे. आम्ही न्यायालयात दाद मागू, असे वक्तव्य नितीश कुमार यांनी केले आहे, तर नितीश कुमार यांच्या वक्तव्याला माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार सुशीलकुमार मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मणिपूर मध्ये जेडीयू फुटल्याने तो पक्ष तिथेच संपुष्टात आला आहे. बिहारमध्ये देखील लवकरच जेडीयू – राष्ट्रीय जनता दल आघाडी तुटेल, असे भाकीत सुशील कुमार मोदी यांनी केले आहे. मूळात नितीश कुमार आणि भाजप यांनी एकत्र येऊन जनतेकडे कौल मागितला होता. जनतेने 5 वर्षांसाठी जेडीयू – भाजप आघाडीला कौल दिला होता. पण नितीश कुमार यांनी विश्वासघात करून तेजस्वी यादव यांच्याबरोबर हात मिळवणे केली. बिहारमध्ये लवकरच ही नवी आघाडी पण फुटेल. कारण नितीश कुमार यांच्या पक्षातल्या बहुसंख्या आमदारांना त्यांचा निर्णय आवडलेला नाही, असे भाकीत सुशीलकुमार मोदी यांनी केले आहे.
Bihar’s failure splits Nitish Kumar’s JDU in Manipur
महत्वाच्या बातम्या
- मणिपूरमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षात बंड : जेडीयूचे 6 पैकी 5 आमदार भाजपमध्ये दाखल, एनडीए सोडण्याच्या निर्णयावर नाराज
- सुप्रीम कोर्टाकडून तिस्ता यांना तात्पुरता जामीन : गुजरात सरकारने जामिनाला केला होता विरोध, प्रतिज्ञापत्रही दाखल
- भाजप अध्यक्ष नड्डांनी दाखवला काँग्रेसला आरसा : म्हणाले- आधी पक्ष जोडा, नंतर ‘भारत जोडो’बद्दल बोला
- Nifty50 : आता अदानींची ही कंपनी निफ्टी50 मध्ये, श्री सिमेंट झाली बाहेर