• Download App
    Bihar News Mucormycosis : Cricket Ball Size Black Fungus removed from one person's Head in Bihar

    अबब…क्रिकेट बॉल एवढी काळी बुरशी ; बिहारमध्ये एका व्यक्तीच्या डोक्यातून काढली

    वृत्तसंस्था

    पाटणा : बिहारमध्ये एका व्यक्तीच्या डोक्यातून क्रिकेट बॉलच्या आकाराएवढा काळ्या बुरशीचा (mucormycosis) पुंजका शस्त्रक्रिया करून काढण्यात आला आहे. Bihar News Mucormycosis : Cricket Ball Size Black Fungus removed from one person’s Head in Bihar

    अनिल कुमार , असे त्या व्यक्तीचे नाव असून तो जम्मूचा रहिवासी आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अनिल कुमार हे नुकतेच कोरोनातून मुक्त झाले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांना चक्कर येत होती आणि ते वारंवार बेशुद्ध पडत होते.

    बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल डॉक्टरांच्या पथकाने अनिल कुमार (वय ६०)यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करून क्रिकेट बॉल एवढ्या आकाराची काळी बुरशी बाहेर काढली आहे. डॉ. ब्रिजेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुमारे तीन तास शस्त्रक्रिया करून बुरशीचा गोळा शुक्रवारी बाहेर काढला आहे.



    डॉ. मनीष मंडल यांनी सांगितले की, अनिल कुमार यांच्या डोळ्यांना कोणताही संसर्ग झाला नाही. परंतु, नाकातून या काळ्या बुरशीची शरीरात प्रवेश केला असावा. जर डोळ्याला संसर्ग झाला असता तर डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली असती. या आजाराने अनेकांचे डोळे काढावे लागले आहेत. असा प्रकार अनिल कुमार यांच्याबाबतीत नव्हता.

    बिहारमध्ये अनेकांना संसर्ग

    बिहारमध्ये काळ्या बुरशीची ५०० प्रकरणे उघडकीस आली आहेत. तयाचा मोठा परिणाम रुग्णावर झाला आहे. त्यामुळे सरकरने हा आजार २२ मे रोजी महामारी म्हणून घोषित केला आहे. हवेतील बुरशीच्या संपर्कात आल्याने अनेक जणांना आजाराचा संसर्ग झाला आहे. कोरोना झालेले, ज्यांना मधुमेह आहे आणि ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, अशा व्यक्तींना हा आजार प्रामुख्याने झाला आहे. दुसरीकडे या आजारावरील Amphotericin B या औषधाची टंचाई असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    Bihar News Mucormycosis : Cricket Ball Size Black Fungus removed from one person’s Head in Bihar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!