• Download App
    दिग्विजय यांचे सर्वात निकटवर्ती हिरेंद्रप्रताप सिंहसुद्धा भाजपमध्ये। Big jolt to Digvijay Singh

    दिग्विजय यांचे सर्वात निकटवर्ती हिरेंद्रप्रताप सिंहसुद्धा भाजपमध्ये

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ – मध्य प्रदेशच माजी मुख्यमंत्री दिग्विजय यांचे निकटवर्ती हिरेंद्रप्रताप सिंह यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेससाठी हा मोठाच धक्का असल्याचे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हिरेंद्रप्रताप हे काँग्रेसचे माजी आमदार मुलसिंह यांचे पुत्र आहेत. दिवंगत मुलसिंह हे दिग्विजय यांचे निकटवर्ती मानले जात. स्वतः हिरेंद्रप्रताप हे सुद्धा त्यांच्याशी एकनिष्ठ होते. Big jolt to Digvijay Singh

    भाजप तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या धोरणामुळे प्रभावित होऊन हिरेंद्रप्रताप यांच्यासह पाच हजार कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती ज्योतिरादित्य यांनी ट्विटद्वारे दिली. राघोगढ मतदारसंघातून दिग्विजय यांचे वडील बलभद्र १९५१ मध्ये जनसंघाच्या तिकिटावर निवडून आले होते. स्वतः दिग्विजय १९७७ मध्ये येथून काँग्रेसचे आमदार झाले.

    १९८४ मध्ये लोकसभेवर राजगढमधून निवडून येईपर्यंत त्यांनी राघोगढचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मुलसिंह येथून आमदार झाले. २०१३ मध्ये मुलसिंह यांनी प्रकृती बरी नसल्यामुळे दिग्विजय यांचे पुत्र जयवर्धन यांच्यासाठी आमदारकी सोडली होती.

    Big jolt to Digvijay Singh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar Voter List : बिहारच्या व्होटर लिस्टमध्ये नेपाळ-बांगलादेशचे लोक; 1 ऑगस्टपासून चौकशी

    Indian Railways : रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये CCTV कॅमेरे; 15 हजार इंजिनमध्येही बसवणार

    Shubhanshu Shukla : निरोप समारंभात शुभांशू अंतराळातून म्हणाले- भारत आज भी सारे जहाँ से अच्छा! आज पृथ्वीवर परतणार