• Download App
    Shopian Encounter : सुरक्षा दलांचे मोठे यश, शोपियांमध्ये बुऱ्हान वानीच्या भावाचा चकमकीत खात्मा । Big Breaking Shopian Encounter Burhan Wani's brother killed by security forces

    Shopian Encounter : सुरक्षा दलाचे मोठे यश, शोपियांमध्ये बुऱ्हान वानीच्या भावाचा चकमकीत खात्मा

    Shopian Encounter : जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये एन्काउंटरदरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या एन्काउंटरमध्ये जवानांनी बुऱ्हान वानीचा चुलत भाऊ इम्तियाज शाहचा खात्मा केला आहे. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांत शोपियांमध्ये कालपासून एन्काउंटर सुरू होते. या मोहिमेत सुरक्षा दलाने 5 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले आहे. ठार झालेला कुख्यात दहशतवादी इम्तियाज शाह हा गजवा-ए-हिंदचा कमांडर होता. घटनेनंतर जवानांनी परिसरात शोध मोहीम आणखी वेगवान केली आहे. Big Breaking Shopian Encounter Burhan Wani’s brother killed by security forces


    वृत्तसंस्था

    जम्मू कश्मीर : जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये एन्काउंटरदरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या एन्काउंटरमध्ये जवानांनी बुऱ्हान वानीचा चुलत भाऊ इम्तियाज शाहचा खात्मा केला आहे. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांत शोपियांमध्ये कालपासून एन्काउंटर सुरू होते. या मोहिमेत सुरक्षा दलाने 5 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले आहे. ठार झालेला कुख्यात दहशतवादी इम्तियाज शाह हा गजवा-ए-हिंदचा कमांडर होता. घटनेनंतर जवानांनी परिसरात शोध मोहीम आणखी वेगवान केली आहे.

    काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी त्रालमधील चकमकीदरम्यान अन्सार गजवात-उल-हिंद एजीएचचा कमांडर इम्तियाज शाह हा ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुरक्षा दलांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोपियांच्या जान मुहल्लामध्ये सुरू असलेल्या चकमकीत पाच, तर त्रालमध्ये 2 दहशतवादी ठार झाले आहेत.

    या चकमकींमध्ये सैन्यातील एका अधिकाऱ्यासमवेत चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारांसाठी सैन्याच्या 92 बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Big Breaking Shopian Encounter Burhan Wani’s brother killed by security forces

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!