वृत्तसंस्था
सिंगापूर : भारत आणि चीन यांच्यातील संबंध सध्या ‘बॅडपॅच’ मधून जात असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. कारण कराराचे उल्लंघन करत चीनने सीमेवर आक्षेपार्ह घडामोडी केल्या असून याबाबत चीनकडून ठोस स्पष्टीकरण आले नसल्याचे जयशंकर यांनी नमूद केले. ब्लूमबर्ग न्यू इकोर्नामिक फोरमध्ये बोलताना जयशंकर म्हणाले की, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यांच्याशी अनेकदा चर्चा झाली आहे. Big bdpatch in India china relations
भारताशी असलेल्या संबंधावरून चीनच्या मनात गोंधळ असेल, असे वाटत नाही. आपण नेहमीच स्पष्ट बोलतो आणि त्यांना भारताचे म्हणणे ऐकायचे असेल तर त्यांनी आतापर्यंत माझे म्हणणे ऐकले असेल, असेही जयशंकर म्हणाले.
भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध कोणत्या दिशेला न्यायचे आहेत, याबाबत चीनच्या नेतृत्वाने खुलासा करावा, अशीही अपेक्षा परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली.
Big bdpatch in India china relations
महत्त्वाच्या बातम्या
- वेळेच्या चौकटीशिवाय भरतीप्रक्रिया व्यर्थ, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
- ‘मन ही मन तुझे चाहा…’ अमृता फडणवीस यांचं नवं गाण झालं लॉन्च ; चाहत्यांनी दिला मोठा प्रतिसाद
- शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला १०० कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप
- पाकिस्तानातून चीनला जाणारे रेडिओॲक्टिव्ह पदार्थ मुंद्रा पोर्टवर जप्त, कस्टम आणि महसूल गुप्तचर विभागाची कारवाई