• Download App
    तेलंगणा सरकारकडून शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठी घोषणाBig announcement from the Telangana government for the families of the farmers who died during the farmers' agitation

    तेलंगणा सरकारकडून शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठी घोषणा

     

    आंदोलनातील सर्व पीडित कुटुंबांना कोणत्याही अटीशिवाय प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्याची विनंतीही केसीआर यांनी केंद्र सरकारला केली आहे.Big announcement from the Telangana government for the families of the farmers who died during the farmers’ agitation


    विशेष प्रतिनिधी

    तेलंगणा : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे.ते म्हणाले की , शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाला 3 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल, अशी घोषणा केली आहे.


    केसीआर – मजलीस यांच्या “इलू इलू”मधून हैदराबादला मुक्त करू; अमित शहांची ग्वाही


    यापूर्वी भाजप खासदार वरुण गांधी यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पंजाब सरकारने पीडित शेतकरी कुटुंबांसाठी यापूर्वीच अनेक प्रकारची मदत जाहीर केली आहे.

    केसीआर यांच्या घोषणेनंतर या मागणीला आणखी जोर मिळू शकतो.दरम्यान आंदोलनातील सर्व पीडित कुटुंबांना कोणत्याही अटीशिवाय प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्याची विनंतीही केसीआर यांनी केंद्र सरकारला केली आहे.

    ते म्हणाले की, तेलंगणा सरकारने कृषी कायद्यांविरोधात लढताना प्राण गमावलेल्या ७५० हून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनेही कोणत्याही अटीशिवाय सर्व शेतकऱ्यांवर दाखल केलेले खटले मागे घ्यावेत.

    Big announcement from the Telangana government for the families of the farmers who died during the farmers’ agitation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र