• Download App
    अयोध्येत मोठी दुर्घटना, शरयू नदीत स्नान करताना एकाच कुटुंबातील 12 जणांचा बुडून मृत्यू । Big accident in Ayodhya, 12 people of same family drowned while bathing in Saryu river

    अयोध्येत मोठी दुर्घटना, शरयू नदीत स्नान करताना एकाच कुटुंबातील 12 जणांचा बुडून मृत्यू

    Big accident in Ayodhya : अयोध्यामधील शरयू नदीत 12 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृत सर्व एकाच कुटुंबातील आहेत. गुप्तार घाटावर स्नान करत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहोचली असून त्यांनी बचावकार्य वेगवान करण्यास सांगितले आहे. यासाठी पाणबुडेही तैनात करण्यात आले आहेत. Big accident in Ayodhya, 12 people of same family drowned while bathing in Saryu river


    विशेष प्रतिनिधी

    अयोध्या : अयोध्यामधील शरयू नदीत 12 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृत सर्व एकाच कुटुंबातील आहेत. गुप्तार घाटावर स्नान करत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहोचली असून त्यांनी बचावकार्य वेगवान करण्यास सांगितले आहे. यासाठी पाणबुडेही तैनात करण्यात आले आहेत. ताज्या माहितीनुसार, शरयू दुर्घटनेतील आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी तिघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर उर्वरित 6 जणांचा शोध सुरू आहे.

    पावसाळ्यात दरवर्षी पुराने त्रस्त असणाऱ्या यूपीमध्ये या वेळी कमी परिणाम जाणवला आहे. परंतु पावसाळ्यात नद्यांच्या पाण्याची पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. बर्‍याच नद्यांचा प्रवाहही वेगवान आहे. अशा परिस्थितीत थोडाही निष्काळजीपणा एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकतो.

    15 जण स्नान करत होते, 12 जण बुडाले

    मिळालेल्या माहितीनुसार, शरयूमध्ये एकूण 15 जण स्नान करत होते, त्यातील 12 जण बुडाले आहेत. बुडत असताना तीन जणांना पाणबुड्यांनी वाचवले. बुडणाऱ्यांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. हे कुटुंब आग्राच्या सिकंदराबादेतून अध्योध्येत आले होते.

    Big accident in Ayodhya, 12 people of same family drowned while bathing in Saryu river

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य