प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हायला लावल्यानंतर काँग्रेस हायकमांडने आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पायउतार होण्यास सांगितल्याची माहिती मिळते आहे. Bhupesh Baghel’s number after Captain Saheb
रिपब्लिक न्यूज नेटवर्कने या संदर्भात बातमी दिली आहे. भूपेश बघेल आज तातडीने रायपूर येथून नवी दिल्लीत आले. त्यांना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हायला सांगितल्याचे समजते. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी यांची भेट घेण्याची सूचना देखील त्यांनी भूपेश बघेल यांना केल्याची माहिती आहे. काँग्रेस मधले बंडखोर नेते आणि छत्तीसगडचे मंत्री टी. एस. सिंगदेव हे आधीच राजधानीमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याचे सांगण्यात आल्याचे समजते. भूपेश बघेल यांनी दिवाळीपर्यंत काँग्रेस हायकमांडकडे वेळ मागितला असून त्यानंतर कदाचित ते पायउतार होतील, असे सांगण्यात येत आहे.
परंतु, भूपेश बघेल यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने आधीच उत्तर प्रदेशाच्या विधानसभेची विधानसभा निवडणुकीची अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. प्रियांका गांधी यांच्या समवेत भूपेश बघेल यांनी लखीमपुरचा दौरा देखील केला आहे. भूपेश बघेल यांना ही नवीन असाइनमेंट दिल्यामुळे त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेतले जाईल, अशी अटकळ यापूर्वीच राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती.
पंजाबमध्ये जशा पद्धतीने कॅप्टन अमरिंदरसिंग यांना हटविण्यात आले त्याच पद्धतीने भूपेश बघेल यांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात येईल. फक्त या दोन नेत्यांमधील फरक हा आहे की कॅप्टन साहेबांना काँग्रेसने नवीन कोणतीही असाइनमेंट दिलेली नाही तर भूपेश बघेल यांच्याकडे मात्र उत्तर प्रदेशासारख्या अत्यंत महत्त्वाच्या राज्याची प्रभारी पदाची जबाबदारी काँग्रेस हायकमांडने सोपवलेली आहे.
Bhupesh Baghel’s number after Captain Saheb
महत्त्वाच्या बातम्या
- सोशल मीडियावरद्वारे न बोलण्याचे सोनियांचे निर्देश सिद्धूंनी डावलले, 13 मुद्द्यांवर लिहिले पत्र, सोशल मीडियावर केले पोस्ट
- पंजाब काँग्रेसमध्ये गोंधळ सुरूच, सिद्धूंनी सोनिया गांधींना 13 मुद्द्यांवर लिहिले पत्र, भेटण्यासाठी मागितली वेळ
- कांदा पुन्हा भडका, दिवाळीपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता नाही, पावसामुळे पिकाचे नुकसान, महागाईत वाढ
- दिल्ली विद्यापीठात ‘ नंबर जिहाद’ ; जेएनयूनंतर बनतेय काँग्रेस, तुकडे तुकडे गँग आणि देशद्रोही जिहादी डाव्या पक्षांचा अड्डा
- तामिळनाडूत सत्ता गमावल्यानंतरही अम्मांच्या सावलीत अण्णा द्रमूकच्या सुवर्ण महोत्सवाचे सेलिब्रेशन, पण पक्ष करिष्माई नेत्याच्याही शोधात!!