विशेष प्रतिनिधी
भोपाळ: भोपाळचे स्वच्छता ब्रँड अम्बॅसिटर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चोवीस तासांत ज्येष्ठ बॉलीवूडअभिनेते रझा मुराद यांची हकालपट्टी करण्यात आली. मध्य प्रदेशचे मंत्री भूपेंद्र सिंह यांच्या सूचनेवरून पदावरून हटवण्यात आले. शहरी प्रशासन आणि विकास मंत्र्यांनी भोपाळ महानगरपालिकेला रझा मुराद यांना तात्काळ प्रभावाने पदावरून हटवण्याचे निर्देश दिले.Bhopal’s cleanliness brand ambassador Raza Murad was expelled within 24 hours of his appointment
रझा मुराद यांची शुक्रवारीच भोपाळचे स्वच्छता ब्रॅँड अम्बॅसिटर म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, मुराद यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. प्यारे मियाँ प्रकरणातही त्यांचे नाव आले होते. त्यामुळे मंत्री भुपेंद्र सिंह यांनी मुराद यांना पदावरून हटवण्याचे निर्देश दिले.
- History of Kamalapati : कोण होत्या राणी कमलापती? ज्यांच्या नावे आता भोपाळचे रेल्वे स्टेशन ओळखले जाईल
हकलापट्टीनंतर रझा मुराद यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा मी आदर करतो. ते निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. मी त्यांचा आदर करतो. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर मला कोणतेही भाष्य करायचे नाही.
पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी स्वखचार्ने कार्यक्रमासाठी आलो होतो. मी हॉटेलमध्येही माझ्या खचार्ने राहिलो. मी महापालिकेकडे पैसे मागितले नाहीत. हे माझे भोपाळवरील प्रेम आहे.रझा मुराद यांचे काँग्रेस पक्षाशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळेही त्यांना पदावरून हटविण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
Bhopal’s cleanliness brand ambassador Raza Murad was expelled within 24 hours of his appointment
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारकडून नेताजींना अनोखे स्मरण, आता सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती २३ जानेवारीपासूनच प्रजासत्ताक दिनाची सुरूवात
- उत्तर भारतात थंडीपासून अद्याप दिलासा नाही
- पन्नास वर्षांपासून हाती कॉँग्रेसचा झेंडा, न्याय न मिळाल्याने पंजाबमधील ज्येष्ठ नेत्याचा आपमध्ये प्रवेश
- पैैशासाठी दिल्लीतील पत्रकाराकडून चीनसाठी हेरगिरी, गोपनिय आणि संवेदनशील माहिती पुरविली
- सोनू सूदच्या बहिणीला उमेदवारी दिल्याने कॉँग्रेसमध्ये गृहकलह, विद्यमान आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
- योहानीचे सुपर डुपर गीत; भाजपच्या प्रचारात युपीत हिट!!…कसे ते ऐकाच!!