भिवंडीत आल्यानंतर राज ठाकरे यांचे फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आल.Bhiwandi: Raj Thackeray inaugurates MNS Central Public Relations Office
विशेष प्रतिनिधी
भिवंडी : येत्या काही दिवसात ठाण्यातील भिवंडीमध्ये निवडणुका होणार आहेत.या निवडणुकीत भिवंडीमध्ये आपला पाया भक्कम करण्यासाठी मनसेकडून भिवंडीतील अशोक नगर येथे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे.दरम्यान आज ( सोमवारी ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते भिवंडी शहरातील अशोक नगर येथील मनसेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यातआले.
भिवंडीत आल्यानंतर राज ठाकरे यांचे फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आल. कार्यालयाचे उदघाटन करून कार्यकर्त्यांशी संवाद न साधताच राज ठाकरे परतल्याने मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झालेला दिसला.
- THANE : भिवंडीत अवैधरित्या राहणाऱ्या ४० बांगलादेशींना अटक ! आधार कार्डसह पॅनकार्ड जप्त ; गुन्हा दाखल
यावेळी ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, अभिजित पानसे, भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी, प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे, मनविसेनेचे संतोष साळवी, परेश चौधरी व अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान राज ठाकरे यांच्या भिवंडी आगमनाने कार्यकर्त्यांना संजीवनी मिळाली असून पुढील काळात राज साहेब ठाकरे भिवंडी शहराकडे विशेष लक्ष देतील असा विश्वास शहराध्यक्षा मनोज गुळवी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
Bhiwandi: Raj Thackeray inaugurates MNS Central Public Relations Office
महत्त्वाच्या बातम्या
- सुवर्ण मंदीर प्रकरणातील दोषींना सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या ; नवज्योत सिंग सिद्धू यांची मागणी
- राज्य शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपेकडे सापडले घबाड, दोन कोटींची रोकड आणि सोन्याने भरलेला डबा
- आमने-सामने : पंकजाताईंचा वार-असलं राजकारण आम्हाला गोपीनाथ मुंडेंनी शिकवलं नाही !…हा विश्वास पवार साहेबांचा धनुभाऊंचा पलटवार …
- गुलाबराव पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर दस्तुरखुद्द हेमा मालिनी यांनी दिले उत्तर, नेमकं काय म्हणाल्या? वाचा सविस्तर…