प्रतिनिधी
मुंबई : “घर फिरले की घराचे वासेही फिरतात”, याचा प्रत्यय शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना आज घ्यावा लागला. ईडीच्या नोटिशीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी म्हणून त्या मुंबईला वर्षावर गेल्या. त्यांना एक तास प्रतिक्षा करावी लागली पण अखेर मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही. या भेटीविनाच त्यांनामाघारी परतावे लागले असे समजते. bhavana gavali not meeting to cm
खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या वरून भावना गवळी यांना ईडीचे समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे भावना गवळी यांना आता ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.
मात्र त्याआधी भावना गवळी ह्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी, १ ऑक्टोबर रोजी वर्षा बंगल्यावर गेल्या होत्या. मात्र १ तास त्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले. त्यानंतर मात्र त्या मुख्यमंत्र्यांना न भेटताच परत माघारी फिरल्या, त्यामुळे शिवसेनेकडून भावना गवळी यांना “वर्षा”वरून वाऱ्यावर सोडण्यात आले आहे काय?, अशी चर्चा शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळात आता सुरु झाली.
१०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप!
खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीने गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले होते. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने येथून अनेक कागदपत्रे जप्त केली होती. भावना गवळी यांच्याशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्याशिवाय, गवळी यांच्या एका संस्थेच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार स्वत: गवळी यांनी केली होती. त्या तक्रारीनंतर सोमय्या यांनी गवळी यांच्यावर निशाणा साधला होता. इतके पैसे गवळी यांच्याकडे आले कुठून, असा सवाल त्यांनी केला होता. तसेच, चौकशीची मागणीही केली होती. तेव्हापासून गवळी ईडीच्या रडारवर असून त्यांच्यावर झालेल्या आरोपांची शहानिशा ईडीकडून केली जात आहे.
bhavana gavali not meeting to cm
महत्त्वाच्या बातम्या
- GST Collection : सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन १,१७,०१० कोटी रुपयांवर, वार्षिक आधारावर २३% वाढ
- ”मुलांना पार्ले-जी खाऊ घाला, नाहीतर अनर्थ होईल’, अफवेमुळे बिस्किटांचा अचानक वाढला खप, स्टॉकिस्टही झाले हैराण
- Navratri 2021 : मूर्ती विसर्जनावेळी फक्त पाच जणांना परवानगी, बीएमसीने नवरात्रोत्सवासाठी जारी केली नियमावली
- नाशिकमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर ३.५ तीव्रता, केंद्रबिंदू जमिनीच्या ३ किमी आत
- राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर, सरकारकडून लेखी आश्वासनावर ठाम; आपत्कालीन रुग्णसेवा पुरवणार