विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोना काळात अथकपणे रुग्ण व लोकसेवा करणारे डॉक्टर, परिचारिका आणि निमआरोग्य कर्मचाऱ्यांना यंदा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जावे, अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.Bharatratna awrd should be given to doctors
वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मारन करण्यासाठी नियमात बदल करणे आवश्यकक असेल, ते केले जावेत. डॉक्टरांना हा सन्मान दिल्यास प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असेही ते पत्रात म्हणतात.
या जागतिक साथीत ज्या डॉक्टरांनी त्यांचे जीव गमावले आहेत,
त्यांना ही आदरांजली ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. भारतरत्न हा देशातील सर्वोच्च सन्मान असून तो डॉक्टर, परिचारिका आणि निमआरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्यास त्यांचा तो खरा सन्मान ठरेल. त्यांचे आभार मानण्यासाठी ‘भारतरत्न’शिवाय अन्य कोणताही दुसरा मार्ग असू शकत नाही, असे केजरीवाल यांनी पत्रात म्हटले आहे.
Bharatratna awrd should be given to doctors
महत्त्वाच्या बातम्या
- भगौड्या नीरव मोदीची बहिणीनेही सोडली साथ, १७ कोटी रुपये भारताला परत देत बनली माफीचा साक्षीदार
- अयोध्येत भगवा फडकविण्यासाठी कॉँग्रेस आणि बहुजन समाज पक्षानेही केली भाजपला मदत
- गाझियाबाद आणि गुवाहाटीचा संदेश; लांगूलचालन नाही, तर पुरोगामी – प्रगतिशील मुस्लीमांचे सामीलीकरण
- औरंगाबादच्या इरफान उर्फ दानिशचा लाकडी खेळण्यांच्या नावाखाली हत्यारे खरेदी – विक्रीचा “खेळ” जूनाच…!!; आता विकलेल्या तलवारींचा शोध सुरू