• Download App
    भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये; फारूक अब्दुल्लांनी राहुल गांधींची केली आद्य शंकराचार्यांशी तुलना Bharat Jodo Yatra in Jammu and Kashmir

    भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये; फारूक अब्दुल्लांनी राहुल गांधींची केली आद्य शंकराचार्यांशी तुलना

    वृत्तसंस्था

    लखनपूर : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आपला अंतिम पडाव जम्मू काश्मीर मध्ये पोहोचली आहे. तेथे पोहोचताच माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्लांनी यात्रेचे लखनपूर मध्ये स्वागत केले. Dr. Farooq Abdullah compared rahul Gandhi with adi Shankaracharya, got trolled in social media

    तेथे झालेल्या जाहीर सभेत डॉक्टर अब्दुल्ला यांनी राहुल गांधींची तुलना थेट आद्य शंकराचार्यांशी केली. काही शतकांपूर्वी आद्य शंकराचार्य असेच दक्षिणेतून पायी निघाले होते आणि ते जम्मू काश्मीरमध्ये येऊन पोहोचले होते. त्यावेळी रस्ते किंवा कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. फक्त जंगले होती. पण आज परिस्थिती बदलली आहे. त्यावेळी आद्य शंकराचार्य जम्मू-काश्मीरमध्ये आले होते. आज राहुल गांधींनी कन्याकुमारीपासून चालत येऊन जम्मू-काश्मीर गाठले आहे, अशा शब्दांत फारूक अब्दुल्लांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

    मात्र, त्यांनी राहुल गांधींची थेट आद्य शंकराचार्यांची तुलना केल्यामुळे सोशल मीडिया त्यांना जोरदार ट्रोल करण्यात येत आहे.
    जम्मू – काश्मीर मधून 370 कलम हटवल्याबद्दल डॉ. फारूक अब्दुल यांनी पुन्हा एकदा आगपाखड केली. 370 कलम हटवल्यामुळे दहशतवाद संपल्याची स्वप्ने केंद्र सरकारला पडत असतील. पण मी आजही माझ्या रक्ताने लिहून देतो, दहशतवाद संपलेला नाही. जोपर्यंत भारत सरकार पाकिस्तानशी बातचीत करत नाही, तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही, असा धमकी वजा इशारा देखील डॉ. फारूक अब्दुल्लांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत केंद्रातल्या मोदी सरकारला दिला.

    कठूआमध्ये संजय राऊत यात्रेत सामील

    भारत जोडो यात्रा आज कठूआ मध्ये पोहोचली असून तेथून यात्रा सुरू करत पुन्हा यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत सहभागी झाले आहेत. खासदार राहुल गांधी भारत जोडायला निघाले आहेत. आम्ही त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने येथे आले असल्याचे राऊत म्हणाले.

    Dr. Farooq Abdullah compared rahul Gandhi with adi Shankaracharya, got trolled in social media

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र