Covaxin third phase trial results : स्वदेशी लस उत्पादक भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या तिसर्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. यासह तिसऱ्या टप्प्यातील निकाल अधिकृतपणे कंपनीने जाहीर केले आहेत. यानुसार कोव्हॅक्सिन गंभीर कोरोना आणि डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांवरही प्रभावी असल्याचे आढळले आहे. Bharat Biotech Covid Vaccine Covaxin third phase trial results 93 per cent effective in Serious Corona Cases
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वदेशी लस उत्पादक भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या तिसर्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. यासह तिसऱ्या टप्प्यातील निकाल अधिकृतपणे कंपनीने जाहीर केले आहेत. यानुसार कोव्हॅक्सिन गंभीर कोरोना आणि डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांवरही प्रभावी असल्याचे आढळले आहे.
भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यातील निकालाच्या आधारे म्हटले आहे की, कोव्हॅक्सिन लस एकूणच कोरोनाविरुद्ध 77.8% प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
डेल्टा प्रकारांविरुद्धही प्रभावी
त्याचबरोबर, ही लस जगभरात दहशत पसरविणार्या धोकादायक डेल्टा प्रकारांविरुद्ध 65.2% प्रभावी असल्याचे आढळले आहे. कोव्हॅक्सिन गंभीर संक्रमण रोखण्यासाठी 93.4% प्रभावी असल्याचे नोंदविण्यात आले आहे. ही लस असिम्प्टोमॅटिक कोरोना रुग्णांवर 63.6% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.
कोव्हॅक्सिन 77.8% प्रभावी
कोव्हॅक्सिनच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीने हे सिद्ध केले की त्याची एकूण कार्यक्षमता 77.8% आहे. तर त्याची संपूर्ण कार्यक्षमता कोरोना विषाणूच्या तीव्र संक्रमणावर 93.4 टक्के असल्याचे दिसून आले.
कोव्हॅक्सिन ही लस 60 वर्षांवरील लोकांसाठी 67.8% आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी 79.4% प्रभावी आहे. तथापि, चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात सुमारे 99 स्वयंसेवकांमध्ये गंभीर दुष्परिणामदेखील दिसून आले. कंपनीने 130 कोरोना प्रकरणांवरही ही ट्रायल घेतली आहे.
कोणत्या बाबतीत किती प्रभावी आहे कोव्हॅक्सिन?
- असिम्प्टोमॅटिक केस : 63% प्रभावी
- डेल्टा व्हेरिएंट : 65% प्रभावी
- सौम्य, मध्यम व गंभीर लक्षणांत : 78% प्रभावी
- गंभीर कोरोना रुग्णांत : 93% प्रभावी
Bharat Biotech Covid Vaccine Covaxin third phase trial results 93 per cent effective in Serious Corona Cases
महत्त्वाच्या बातम्या
- हाकेच्या अंतरावरील ईडी कार्यालयात जाणे कोरोनामुळे टाळणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अचानक दिल्लीला रवाना
- Ashadhi Wari 2021 : पायी वारीसाठी आग्रही असणाऱ्या बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- Aamir Khan Announces Divorce : आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट, लग्नाच्या 15 वर्षांनी मार्ग झाले वेगळे
- अवघ्या 115 दिवसांत उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, घटनात्मक अडचण काय? पुढेच मुख्यमंत्री कोण? जाणून घ्या!
- न्यूयॉर्क टाइम्समध्ये पत्रकारितेची संधी, पात्रता – हिंदूविरोधी, मोदीविरोधी, अँटी इंडिया स्टोरीज! वाचा सविस्तर…