वृत्तसंस्था
जयपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीजींचे सत्य, अहिंसा, धर्मनिरपेक्षता स्वीकारली तर हिंदुत्व, लव्ह जिहाद सारखे मुद्दे संपून जातील, असे प्रतिपादन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केले आहे.Bhagwat, if Modi accepts truth, non-violence, secularism, Hindutva, love jihad will end: Ashok Gehlot
गांधी जयंती निमित्त एका कार्यक्रमात ते बोलत होते अशोक गेहलोत म्हणाले, की ज्यांची विचारसरणी गांधीजींना मारणाऱ्या व्यक्तीची आहे, त्यांनी साठ वर्षानंतर गांधीजी स्वीकारले आहे. आता मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांचे सत्य अहिंसा आणि धर्मनिरपेक्ष हे विचार मनापासून स्वीकारले तर हिंदुत्व आणि लहुजी लव्ह जिहाद यांच्यासारखे मुद्दे कायमचे संपुष्टात येतील, असे ते म्हणाले.
दोनच दिवसांपूर्वी राजस्थानच्या विकास कार्यक्रमांमध्ये अशोक गेहलोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांची स्तुती केली होती. अशोक गहलोत आणि माझ्या राजकीय पक्षाची विचारसरणी भिन्न आहे. तरी देखील भारतीय लोकशाहीचे सौंदर्य असे आहे की आम्ही विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊ शकतो. देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेऊ शकतो, असा विश्वास वाटतो. अशोक गहलोत यांनी हा विश्वास माझ्यावर दाखविला आहे, अशा शब्दात मोदींनी अशोक गेहलोत यांचे कौतुक केले होते.
अशोक गेहलोत यांनी देखील त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढे राजस्थानच्या विकासासाठी आवश्यक कामांची आणि योजनांची यादी वाचून दाखविली होती. दोन दिवसांनंतर अशोक गेहलोत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांना गांधीजींच्या सत्य अहिंसा आणि धर्मनिरपेक्षता मार्गावर चालण्याचा उपदेश केला आहे.
हिंदुत्व आणि लव्ह जिहाद यांच्यासारखे मुद्दे त्यामुळे संपुष्टात येतील, असेही म्हटले आहे. अशोक गहलोत यांच्या दोन्ही भाषणांची त्यामुळे तुलना होते आज राजकीय वर्तुळात तुलना होत आहे.अशोक गहलोत यांच्या दोन दिवसांपूर्वीच या भाषणावरून काँग्रेस हायकमांड नाराज असल्याचे बोलले जात आहे.
त्यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केल्याने हायकमांडची नाराजी वाढली असल्याचे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कालच्या गांधी जयंतीच्या भाषणात सरसंघचालक आणि पंतप्रधान यांना गांधीजींच्या मार्गावर चालण्याचा उपदेश करून अशोक गहलोत यांनी राजकीय संतुलन साधण्याचा आणि काँग्रेस हायकमांडचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला आहे काय?, असे सवाल राजकीय वर्तुळातून विचारले जाऊ लागले आहेत.
Bhagwat, if Modi accepts truth, non-violence, secularism, Hindutva, love jihad will end: Ashok Gehlot
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला