• Download App
    Bhabanipur by Polls : कोलकाता डीसीपीवर भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार । Bhabanipur by Polls BJP alleges Kolkata DCP South molested leader Priyanka, demands action

    Bhabanipur by Polls : कोलकाता डीसीपीवर भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार

    Bhabanipur by Polls : पश्चिम बंगालच्या भवानीपूरमधील पोटनिवडणुकीत राजकीय संघर्ष तीव्र झाला. येथे भाजपने प्रियांका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन झाल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. कोलकाताचे डीसीपी आकाश मघेरिया यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या प्रियंका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा भाजपचा आरोप आहे. Bhabanipur by Polls BJP alleges Kolkata DCP South molested leader Priyanka, demands action


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालच्या भवानीपूरमधील पोटनिवडणुकीत राजकीय संघर्ष तीव्र झाला. येथे भाजपने प्रियांका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन झाल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. कोलकाताचे डीसीपी आकाश मघेरिया यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या प्रियंका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा भाजपचा आरोप आहे.

    भाजपने निवडणूक आयोगाला पत्र लिहून डीसीपी आकाश मघेरिया यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. भाजपचा आरोप आहे की, भवानीपूरच्या उमेदवार प्रियांकांविरुद्ध हा गैरव्यवहार झाला, जेव्हा त्या ममता बॅनर्जी यांच्या घरासमोर भाजप कार्यकर्त्याच्या मृतदेहाला घेऊन निषेध करण्यासाठी गेल्या होत्या.

    प्रियांका टिबरेवाल यांच्यावर गुन्हा दाखल

    यापूर्वी, प्रियांका टिबरेवाल आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांच्यासह भाजप कार्यकर्ते हे मोगराघाटच्या एका भाजप कार्यकर्त्याचे मृतदेह घेऊन ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यासाठी गेले होते. याप्रकरणी प्रियांका आणि सुकांता मजुमदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कालीघाट पोलीस ठाण्याने याप्रकरणी स्वत: दखल घेतली. त्याचवेळी माध्यमांना टिबरेवाल म्हणाल्या की, त्यांच्याविरुद्धची केस त्यांची मोहीम थांबवणार नाही. ममता बॅनर्जीदेखील भवानीपूरच्या मतदार आहेत, त्या स्वतः त्यांच्या घरी जाऊन मत मागतील.

    या नेत्यांवर गुन्हा दाखल

    ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर निषेध केल्याबद्दल पोलिसांनी प्रियांका टिबरेवाल, सुकांता मजुमदार, भाजप खासदार ज्योतिर मोय सिंह, अर्जुन सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    Bhabanipur by Polls BJP alleges Kolkata DCP South molested leader Priyanka, demands action

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य