• Download App
    कोरोनाकाळात देशविरोधी शक्तींपासून सावध राहा, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांचे आवाहन Beware of anti-national forces during Corona period, RSS Sarkaryvah Dattatraya Hosballe appeals

    कोरोनाकाळात देशविरोधी शक्तींपासून सावध राहा, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांचे आवाहन

    Beware of anti-national forces during Corona period, RSS Sarkaryvah Dattatraya Hosballe appeals

    कोरोना महामारीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन काही देशविरोधी आणि समाजविघातक शक्ती नकारात्मकता आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याची भीती आहे. त्यांच्यापासून सावध राहूनन धैर्य, मनोबल उंच ठेवत परस्पर सहकार्य आणि संयमाने संकटाचा सामना करण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केले. Beware of anti-national forces during Corona period, RSS Sarkaryvah Dattatraya Hosballe appeals


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : कोरोना महामारीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन काही देशविरोधी आणि समाजविघातक शक्ती नकारात्मकता आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याची भीती आहे. त्यांच्यापासून सावध राहूनन धैर्य, मनोबल उंच ठेवत परस्पर सहकार्य आणि संयमाने संकटाचा सामना करण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केले.

    कोरोना साथरोगाचा विळखा देशाला पडला आहे. परिस्थिती विक्राळ रूप धारण करतेय. या वातावरणात नागरिकांनी आशा, विश्वास आणि सकारात्मक वातावरण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सांगून होसबळे म्हणाले, कोरोना साथरोगाच्या संकटात सापडलेल्या कुटुंबांबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. तसेच समाजाने एकमेकांच्या सहकायासार्ठी पुढे यावे.



    ते म्हणाले, अनेक कुटुंबांनी कोरोनामुळे आपले प्रियजन गमावले आहेत. त्यांचे दु:ख, वेदना शब्दात मांडणे कठीण आहे. परिस्थिती बिकट असली तरी समाज म्हणून संघषार्ची आमची शक्ती कायम ठेवली पाहिजे. परस्पर सहकार्य, स्नेह, संयम आणि अनुशासनाचे पालन करून आम्ही या संकटावर नक्की मात करू.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्व सामाजिक व धार्मिक संघटना, संस्था आणि उद्योजकांना त्यांनी या संकटकाळात यथासंभव योगदान द्यावे असे आवाहन करून होसबळे म्हणाले, सेवाकार्यात सक्रिय असणाऱ्यानी सुरक्षित अंतर राखणे, मास्क लावणे, स्वच्छता अशा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासोबत शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाने शासन-प्रशासन, आरोग्य कमाचार्री, स्वच्छता कर्मचारी यांना संपूर्ण सहकार्य करावे.

    Beware of anti-national forces during Corona period, RSS Sarkaryvah Dattatraya Hosballe appeals


    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले