Bengal Result : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्यात आल्या. परंतु सर्वांचे लक्ष बंगालवर राहिले. वास्तविक येथे थेट स्पर्धा तृणमूल व भाजपमध्ये होती. किंवा असेही म्हणता येईल की हा मोदी विरुद्ध ममता संघर्ष बनला होता. आतापर्यंतच्या कलांवरून दीदींची हॅटट्रिक निश्चित मानली जाते. भाजपने येथे पूर्ण ताकद पणाला लावूनही तृणमूलने 2016 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतलेली आहे. तृणमूलच्या या विजयामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. उदा. आता मोदी विरुद्ध ममता यांच्यात राष्ट्रीय पातळीवरही ‘खेला’ होईल का? बंगाल निकालांचा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांवर परिणाम होईल का? Bengal Result What is the effect of Mamata’s conquest of Bengal on national politics?, read in Details
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्यात आल्या. परंतु सर्वांचे लक्ष बंगालवर राहिले. वास्तविक येथे थेट स्पर्धा तृणमूल व भाजपमध्ये होती. किंवा असेही म्हणता येईल की हा मोदी विरुद्ध ममता संघर्ष बनला होता. आतापर्यंतच्या कलांवरून दीदींची हॅटट्रिक निश्चित मानली जाते. भाजपने येथे पूर्ण ताकद पणाला लावूनही तृणमूलने 2016 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतलेली आहे. तृणमूलच्या या विजयामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. उदा. आता मोदी विरुद्ध ममता यांच्यात राष्ट्रीय पातळीवरही ‘खेला’ होईल का? बंगाल निकालांचा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांवर परिणाम होईल का?
2021च्या बंगाल निवडणुकीत आघाडी घेऊन तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी करिष्मा केला आहे. कॉंग्रेस व माकपला पूर्णपणे नेस्तनाबूत करत येथे भाजपनेही देदीप्यमान कामगिरी केली असेच म्हणावे लागेल. भलेही ते सत्तेपासून वंचित आहेत.
मोदींविरुद्ध इतर पक्ष एकत्र नांदणे अशक्य
सध्या देशातील विरोधकांपुढे सर्वात मोठी अडचण काय आहे, तर मोदींना आव्हान देऊ शकेल असा त्या तोडीचा चेहरा त्यांच्याकडे नाही. राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेस अंतर्गत कलहामुळे पुरती बेजार आहे. दुसरे प्रादेशिक पक्ष आपापली राज्ये सोडून मोठ्या मैदानात म्हणजेच राष्ट्रीय राजकारणात विस्तार करू शकत नाहीत. तरीही काही राजकीय पंडितांना आशा आहे की, या सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधता येईल आणि भाजपचा विजयाचा अश्वमेध रोखता येईल. पण हे सगळे घडून येण्यास अनंत अडचणी आहेत. शरद पवार असोत किंवा चंद्रबाबू नायडू, अखिलेश यादव, मायावती, उद्धव ठाकरे किंवा इतर कोणत्याही प्रादेशिक नेत्याबद्दल बोलायचे झाल्यास पंतप्रधान मोदींच्या तुलनेत त्यांचे सामर्थ्य कमी आहे, हे ढळढळीत सत्य आहे. भाजपला बंगालमध्ये यश मिळाले नसले तरी नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत काडीचाही फरक पडलेला दिसत नाही.
तिसऱ्या विजयाने दीदींची उंची वाढली
ममतांच्या बंगाल विजयानंतर आता त्याच मोदींना राष्ट्रीय पातळीवर आव्हान देऊ शकतात, असे आडाखे अनेक राजकीय तज्ज्ञ मांडत आहेत. त्यांना राहुल गांधी, शरद पवार आणि ममतांमध्ये तसे नेतृत्व दिसतेय. महाराष्ट्रात शरद पवारांनी केलेला तीन चाकी सरकारचा प्रयोग सर्वजण पाहतच आहेत. आता हेच सर्व विरोधक राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याची भाषा बोलू लागले आहेत. पण यात प्रत्येक नेत्याच्या अनेक मर्यादा आहेत. घडीभर हे सर्व विरोधक एकत्रही आले तरी कलहच जास्त होतील. ममतांच्या तिसऱ्या विजयामुळे त्यांची उंची नक्कीच वाढली आहे. दुसरीकडे, राहुल गांधींनी तामिळ व केरळातील राजकारणावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करूनही, राजकीय दंडबैठका काढूनही त्यांना म्हणावे तसे यश मिळालेले नाही. तामिळनाडूत ते द्रमुकच्या आधारावर तरले आहेत, हे मात्र नक्की.
विरोधक दीदींचे नेतृत्व स्वीकारतील?
आता प्रश्न असा आहे की, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, अकाली दल, सपा, बसपा, द्रमुक यासारखे विरोधी पक्ष एकत्र येऊन ममता दीदींना त्यांचा नेता म्हणून स्वीकारतील काय? हे सर्व पक्ष एकत्रित येऊन पुढच्या दोन-तीन वर्षांत एनडीएला पर्याय तयार करू शकतील काय? विखुरलेल्या विरोधकांना एकत्र येण्यासाठी कॉंग्रेस आपल्या महत्त्वाकांक्षा मर्यादा घालू शकते काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल, पण सध्या तरी ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे, हेही नाकारून चालणार नाही.
Bengal Result What is the effect of Mamata’s conquest of Bengal on national politics?, read in Details
महत्त्वाच्या बातम्या
- Bengal Election Result Live : नंदिग्राममध्ये दिग्गज ममतांनाही फुटला होता घाम, अवघ्या 1200 मतांनी झाला सुवेंदू अधिकारींचा पराभव
- अजून एक काश्मिर तयार होतोय…! बांग्लादेशी आणि रोहिंग्या हीच ममतांची सर्वात मोठी ताकद;कंगनाचा हल्लाबोल
- Pandharpur assembly elections 2021 results analysis : विठ्ठलाच्या पायी कडाडली वीज; ठाकरे – पवारांच्या महाविकास आघाडीच्या “खंजीर प्रयोगाला” जनतेची चपराक
- Belgaum Bypoll Result Live : ५९ राऊंडनंतर सतीश जारकीहोळी ८९७६ मतांनी आघाडीवर; बेळगाव पोटनिवडणुकीत रंगत
- पंढरपूरमध्ये पडले तोंडावर; कोलकात्यात केले “नाक वर”; ममतांच्या विजयाबद्दल अभिनंदनाचे पवारांचे ट्विट