• Download App
    बंगाल मध्ये जिहादी दहशतवादाचे थैमान; ममता राजवटीत आठवडाभरात 26 राजकीय हत्या!! Bengal Jihadi Terrorism in mamata govt.

    Bengal Jihadi Terrorism : बंगाल मध्ये जिहादी दहशतवादाचे थैमान; ममता राजवटीत आठवडाभरात 26 राजकीय हत्या!!

    प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवल्यानंतर सरकारच्या नाकाखाली जिहादी दहशतवादाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट मध्ये लोकांची घरे पेटवून देऊन 13 जणांना जिवंत जाळून हत्या केल्यानंतर बंगाल धुमसतोच आहे. Bengal Jihadi Terrorism in mamata govt.

    पण रामपुरहाट मधील प्रकरण समोर येण्याअगोदर बंगालमध्ये जिहादी दहशतवाद्यांनी 26 राजकीय हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत फक्त आठवडाभरात झालेल्या राजकीय हत्यांचा हा आकडा आहे. त्याच वेळी रामपुरहाट मध्ये लोकांची घरे पेटवून देऊन 13 लोकांना जिवंत जाळण्यात आले, या प्रकरणातला प्रत्यक्षदर्शी व्यक्ती गायब झाला आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी या संदर्भात केस देखील दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

    बंगाल मधील या भयानक जिहादी हिंसाचाराची कोलकत्ता हायकोर्टाने दखल घेतली असून आज दुपारी 2.00 वाजता या प्रकरणावर सुनावणी ठेवली आहे. सध्या सुनावणी सुरू आहे. पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी सरकारला हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे.

     

    – रामपुरहाट मधून पलायन

    ज्या रामपुरहाट मध्ये तृणमुल काँग्रेसचा स्थानिक नेता भादू शेख यांच्या हत्येनंतर भादू शेखच्या जिहादी समर्थकांनी 10 लोकांना घरात कोंडून जिवंत जाळून मारून टाकले. या भयानक हिंसक घटनेनंतर रामपुरहाट मधून लोक पलायन करत असून पश्चिम बंगालमध्ये अन्यत्र देखील याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हायकोर्टाने या सगळ्या प्रकाराची दखल घेतली असून ममता बॅनर्जी सरकारला आपली भूमिका ताबडतोप मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आज दुपारी 2.00 वाजता रामपुरहाट जळीत कांडाची सुनावणी हायकोर्टात होणारा आहे.

    भाजपचे शिष्टमंडळ रामपुरहाट मध्ये

    तत्पूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे एक शिष्टमंडळ रामपूरहाट दौऱ्यावर रवाना झाले आहे. खासदार अर्जुन सिंग, खासदार जगन्नाथ सरकार हे देखील शुभेंदू अधिकारी यांच्याबरोबर या दौर्‍यात समाविष्ट आहेत. ही शिष्टमंडळ रामपुरहाट मधून होणारे पलायन रोखण्याचा प्रयत्न करेल तसेच पीडितांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करेल.

    – राष्ट्रपती राजवटीची मागणी

    पश्चिम बंगालमध्ये हा भडका हिंसाचार लक्षात घेऊन काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. दुपारी 2.00 वाजता हायकोर्टात सुनावणी होत आहे. या सुनावणीत नेमके काय होणार आणि कोलकत्ता हायकोर्ट पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी सरकारला कोणते आदेश देणार?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

    Bengal Jihadi Terrorism in mamata govt.

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!