• Download App
    बेळगावमध्ये 'राणी पार्वती देवी सर्कल'चे नामकरण; 'श्री राजा वीर मदकरी नायक यांचे नाव दिल्याने टिळकवाडीत तणाव Belgaum 'RPD Circle' is Renamed by youths as Shri Raja Veer Madakari Nayak ; tesnsion rises in Tilkwavdi Area

    बेळगावमध्ये ‘राणी पार्वती देवी सर्कल’चे नामकरण; ‘श्री राजा वीर मदकरी नायक यांचे नाव दिल्याने टिळकवाडीत तणाव

    वृत्तसंस्था

    बेळगाव : वाल्मिकी समाजातील तरुणांनी बेळगाव शहरातील आरपीडी (राणी पार्वती देवी – RPD) सर्कलचे नाव बदलून त्या सर्कलला श्री राजा वीर मदकरी नायक यांचे नाव दिले. त्यानंतर टिळकवाडीतील आरपीडी भागात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. Belgaum ‘RPD Circle’ is Renamed by youths as Shri Raja Veer Madakari Nayak ; tesnsion rises in Tilkwavdi Area

    आरडीपी सर्कलला राजा वीर मदकरी नायक, असे नाव देण्यात आले आहे. आज सकाळी काही वाल्मिकी समाजातील तरुणांनी कन्नड, मराठी आणि इंग्रजीमध्ये लिहिलेली नेमप्लेट लावली आहे. त्या नेमप्लेटवर ‘श्री राजा वीर मदकरी नायक सर्कल’ असे लिहिले आहे. त्यातून पोलिस आणि तरुणांमध्ये वाद झाला. पोलिसांची परवानगी घेऊन नेमप्लेट लावावी, असे सुचवले असले तरी, तरुणांनी वाद घालून नामकरण केले आहे.



    राजा वीर मदकरी नायक हे कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील शेवटचे शासक होते. हैदर अलीने केलेल्या हल्ल्यात नायकाने चित्रदुर्ग किल्ला गमावला. अलीचा मुलगा टिपू सुलतानने त्याचा विश्वासघात केला आणि १७९९ मध्ये ठार मारले. राजा वीर मदकरी नायक हा चित्रदुर्गच्या नायकापैकी अत्यंत प्रबळ राजापैकी एक होता. १२ व्या वर्षी हा राजा सिंहासनावर बसला. हैदरअलीने चित्रदुर्गला वेढा देऊन त्याचा पराभव केला. त्यामुळे मदकरीच्या राजवटीबरोबर चित्रदुर्गच्या नायकांचा वंश संपुष्टात आला.

    ओनके ओब्बवाचे आजही स्मरण

    हैदरअलीच्या सैनिकांनी चित्रदुर्ग किल्ल्यात गुप्त मार्गाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पहारेकऱ्याची पत्नी ओनके ओब्बव्वाने मुसळाने अनेक शत्रू सैनिकांना ठार केले. चित्रदुर्ग किल्ल्याच्या पश्चिमेला ‘ओब्बव्वाची खिंड’ पहावयास मिळते.

    Belgaum ‘RPD Circle’ is Renamed by youths as Shri Raja Veer Madakari Nayak ; tesnsion rises in Tilkwavdi Area

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- ऑपरेशन सिंदूर हा 88 तासांचा ट्रेलर होता; पाकने आणखी संधी दिल्यास उत्तर कठोर असेल