• Download App
    काशी विश्वनाथ कॉरिडार उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुष्पवृष्टीने केला श्रमिकांचा सत्कार-सन्मान!! । Before the inauguration of Kashi Vishwanath Corridor, Prime Minister Narendra Modi felicitated the workers with a shower of flowers !!

    काशी विश्वनाथ कॉरिडार उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुष्पवृष्टीने केला श्रमिकांचा सत्कार-सन्मान!!

    विशेष प्रतिनिधी

    काशी : काशी विश्वनाथ कॉरिडाॅरचे उद्घाटन आज दिवसभर देशभरातच नव्हे, तर जगभरातल्या बातमीचा विषय ठरला आहे. पण त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले वैशिष्ट्य दाखवून दिले. काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या घोषणेपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी तिथे गेले 33 महिने राबलेल्या, कष्ट केलेल्या सर्व श्रमिकांचा, कलाकारांचा पुष्पवृष्टी करून सत्कार आणि सन्मान केला. Before the inauguration of Kashi Vishwanath Corridor, Prime Minister Narendra Modi felicitated the workers with a shower of flowers !!

    काशी विश्वनाथ कॉरिडार उद्घाटन समारंभात या सर्व श्रमिकांना विशेष मंचावर स्थान देण्यात आले होते. तेथे प्रत्यक्ष जाऊन पंतप्रधान मोदी यांनी सर्व श्रमिकांवर आपल्या हाताने पुष्पवृष्टी केली. त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार केला. त्यांच्यासमवेत छायाचित्र काढताना मोदींनी सर्व श्रमिकांना आपल्याजवळ बोलावले. आपली खुर्ची तिथून हटवायला सांगितली आणि ते सर्व श्रमिकांमध्ये जाऊन बसले. यावेळी सर्व श्रमिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सर्व श्रमिकांना मोदींनी कृतज्ञता भावाने नमस्कार केला, तर श्रमिकांना देखील मोदींना आनंदाने प्रतिनमस्कार केला.

    काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर उद्घाटन सोहळ्यात हे क्षण अविस्मरणीय ठरले. या भारतात मोठे महाल बांधल्यानंतर श्रमिकांची हात तोडल्याच्या कथा आणि दंतकथा पसरल्या आहेत. त्याच भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांवर पुष्पवृष्टी करून त्यांना अभिवादन केले. ही घटना आज काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरमध्ये प्रत्यक्ष घडली आहे.

    – जगत कल्याण आणि भारत वर्षाचा उत्कर्ष या संकल्पासह काशी विश्वनाथाचे पूजन!!

    तत्पूर्वी, जगत कल्याण आणि भारत वर्षाचा उत्कर्ष या संकल्पासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काशी विश्वनाथ धाम येथील काशी विश्वनाथाचे पूजन केले. मतंग मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काशी विश्वनाथ धाम येथे पोहोचले आणि त्यांनी हर हर महादेव च्या गजरात पूजन केले. यावेळी मोदींच्या हस्ते काशीविश्वनाथास रुद्राभिषेक करण्यात आला.

    यावेळच्या संकल्पात पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथाकडे जगात कल्याण आणि भारत वर्षाच्या उत्कर्षाचा आशीर्वाद मागितला. या पूजनानंतर पंतप्रधान मोदींनी बेलाच्या वृक्षाचे रोपण केले. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगास्नान करून गंगाजल रजत कलशात घेऊन चालत काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले. हे गंगाजल त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथाचे लिंगावर अर्पण केले. तत्पूर्वी मंदिर परिसरात शेकडो डमरू वादकांनी डमरू वादन करत मोदींचे स्वागत केले. त्याचवेळी महिलांकडून रुद्र पठण करण्यात येत होते. रुद्राभिषेक संकल्पात जगत कल्याण आणि भारतवर्षाचा उत्कर्ष पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

    Before the inauguration of Kashi Vishwanath Corridor, Prime Minister Narendra Modi felicitated the workers with a shower of flowers !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar : बिहारच्या बेतिया पोलिस लाईनमध्ये कॉन्स्टेबलने सहकारी सैनिकावर ११ गोळ्या झाडल्या

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून