• Download App
    बिपरजॉयपूर्वी गुजरात-मुंबईच्या किनारी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, गुजरातच्या 7 जिल्ह्यांतून 30 हजार जणांचे स्थलांतर|Before Biparjoy, Gujrat-Mumbai coastal area rains with stormy winds, evacuation of 30 thousand people from 7 districts of Gujarat

    बिपरजॉयपूर्वी गुजरात-मुंबईच्या किनारी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, गुजरातच्या 7 जिल्ह्यांतून 30 हजार जणांचे स्थलांतर

    वृत्तसंस्था

    मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे सरकत आहे. हे वादळ 15 जूनला दुपारी कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरावर धडकणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे वादळ अजूनही धोकादायक असले तरी मंगळवारी ते काहीसे कमकुवत झाले आहे.Before Biparjoy, Gujrat-Mumbai coastal area rains with stormy winds, evacuation of 30 thousand people from 7 districts of Gujarat

    15 जून रोजी गुजरात किनारपट्टीवर 150 किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे. वादळामुळे गुजरात आणि मुंबईच्या किनारी भागात वादळी वारे सुरू असून त्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, नवी मुंबईत मंगळवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली.



    दरम्यान, अमित शहा यांनी काल दिल्लीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. त्यांनी बिपरजॉय चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनासाठी 8000 कोटी रुपयांच्या 3 मोठ्या योजना जाहीर केल्या.

    यामध्ये अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण, पूर नियंत्रण आणि भूस्खलनाच्या घटना रोखणे यांचा समावेश आहे. यानंतर, गुजरात सरकारने कच्छ-सौराष्ट्रमधील किनाऱ्यापासून 10 किमी अंतरावरील 7 जिल्ह्यांतील 30,000 लोकांना बाहेर काढले आणि त्यांना निवारागृहात पाठवले.

    वादळ द्वारकापासून 290 किमी अंतरावर

    मंगळवारी सकाळी 9 वाजता हवामान खात्याच्या अपडेटनुसार, वादळ ताशी 8 किमी वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता हे वादळ पोरबंदरपासून 300 किमी, द्वारकापासून 290 किमी, जाखाऊ बंदरापासून 340 किमी, नलियापासून 350 किमी अंतरावर होते. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ 14 जूनच्या सकाळपर्यंत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे, त्यानंतर ते पुन्हा परत येईल आणि उत्तर-ईशान्य दिशेने सरकेल.

    14 जूनला ऑरेंज अलर्ट आणि 15 जूनला रेड अलर्ट जारी

    IMDचे DG मृत्युंजय महापात्रा म्हणाले – वादळ किनारपट्टीजवळ आल्यावर वाऱ्याचा वेग ताशी 150KM पर्यंत पोहोचू शकतो. यामुळे झाडे, टेलिफोन आणि विजेचे खांब पडू शकतात.

    ISG ALH ध्रुव हेलिकॉप्टरने गुजरातच्या द्वारका किनार्‍यावरून 50 लोकांना बाहेर काढले. IMD नुसार, 14-15 जून दरम्यान कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबी जिल्ह्यांतील विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    वादळामुळे 15 जून रोजी कच्छ, द्वारका, जामनगरमध्ये 20 सेमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यता आहे.

    Before Biparjoy, Gujrat-Mumbai coastal area rains with stormy winds, evacuation of 30 thousand people from 7 districts of Gujarat

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!