पोलिसांनी वातावरण शांत करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून सोम्य लाठीचार्जही करण्यात आला. Beed: BJP-NCP activists clash at polling booths during Nagar Panchayat elections
विशेष प्रतिनिधी
बीड : महाराष्ट्रातील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि त्यानंतर मतदान केंद्राच्या गेटवरच दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली आहे.पोलिसांनी वातावरण शांत करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून सोम्य लाठीचार्जही करण्यात आला.
आज बीड जिल्ह्यात ५ नगरपंचायतीसाठी प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे.दरम्यान या मतदानाला सकाळी ७.३० पासून सुरुवात झाली असून सायंकाळी ५.३० पर्यंत चालणार आहे.बीड जिल्ह्यातील वडवणी, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या ५ ठिकाणच्या नगरपंचायतीसाठी हे मतदान होत आहे.
या ५ नगरपंचायतमध्ये एकूण ८५ उमेदवार आहेत. त्यापैकी २० जाग्यावर ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने, निवडणूक होणार नाही. परंतु उर्वरित ६५ जागांसाठी बीड जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.दरम्यान यासाठी तब्बल २१६ उमेदवार आपलं भविष्य आजमावत असून निवडणूक रिंगणात उभे आहेत.
Beed : BJP-NCP activists clash at polling booths during Nagar Panchayat elections
महत्त्वाच्या बातम्या
- KMC Election Results : कोलकाता महापालिकेची मतमोजणी सुरू, तृणमूल 134 हून अधिक जागांवर पुढे
- आधार लिंक सक्तीची नाही, पण आधार लिंकमुळे मतदार यादी व्यवस्थापन सुकर; दुबार – तिबार मतदारनोंदणी कळेल व टळेल!!
- Election : राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींसाठी मतदान सुरू, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, वाचा सविस्तर
- पंजाबमध्ये विरोधकांचा भाजपमध्ये जंबो प्रवेश; वीस माजी मंत्री, खासदारासह आमदारांचा प्रवेश