वृत्तसंस्था
भोपळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्या करण्यासाठी तत्पर राहा, असे वक्तव्य मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते राजा पटेरिया यांनी केल्यानंतर त्यांच्या विरोधात देशभर संताप उसळला आहे. राजा पटेरिया यांच्या विरोधात मध्य प्रदेशात एफआयआर दाखल झाला असून पोलीस यासंदर्भात त्यांची चौकशी करत आहेत. Be ready to assassinate Modi; Madhya Pradesh Congress leader Raja Pateria’s statement sparked nationwide outrage
राजा पटेरिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील लोकशाही नष्ट करू पाहत आहेत. दलित, आदिवासी, अल्पसंख्यांकांचे जीवन त्यांनी धोक्यात आणले आहे. त्यामुळे त्यांची हत्या करायला तत्पर राहा, असे आवाहन केल्याचे दिसते आहे. वर त्यांनी मोदींची हत्या करायला म्हणजे त्यांचा पराभव करायला तयार राहा, अशी मखलाशीही केली आहे. परंतु त्यांनी मोदींची हत्या करायला तत्पर राहा, हे वाक्य उच्चारल्याचे व्हिडिओत स्पष्ट ऐकू येत आहे.
राजा पटेरिया यांच्या या वक्तव्यावर देशभर संताप उसळला असून अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर उभे राहून त्यांचा थेट मुकाबला करू शकत नाहीत म्हणून ते हत्येच्या बाता करतात, असे शरसंधान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी साधले आहे. राजा पटेरिया यांच्याविरुद्ध मध्य प्रदेशात गुन्हा दाखल झाला असून या संदर्भात पोलीस पुढची कायदेशीर कारवाई करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संदर्भात काँग्रेसच्या राजा पटेरिया यांचे वक्तव्य ही पहिलीच बाब नसून या आधी पंजाबच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता. त्यांचा ताफा पंजाब मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान एका उड्डाणपुलावर अडवून ठेवण्यात आला होता. त्यावेळी तिथे पंजाब मधल्या काँग्रेस सरकारने सुरक्षेची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. या मुद्द्यावरून देशभर गदारोळ झाल्यानंतर पंजाबचे त्यावेळचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांनी मी मोदींसाठी मृत्युंजयाचा जप करतो, असे म्हटले होते आणि आता काँग्रेसचे मध्य प्रदेश मधले नेते राजा पटेरिया यांनी मोदींच्या हत्येची बात केली आहे.
Be ready to assassinate Modi; Madhya Pradesh Congress leader Raja Pateria’s statement sparked nationwide outrage
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसचा आम आदमी पार्टीवर राग; समाजवादी पक्षाचा बसपवर आक्षेप; तरीही विरोधकांना ऐक्याची अपेक्षा
- मोदींना आव्हान कळलेय, टार्गेट सेट केलेय; पण विरोधकांचे काय??
- ७०१ किलोमीटर लांबी, ५५३३५ कोटींचा खर्च; महाराष्ट्राच्या विकासाचा हा समृद्धी महामार्ग!!
- SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ जागांवरील भरतीसाठी असा करा अर्ज