वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनातून तुम्ही बरे झालात. अत्यंत आंनदाची गोष्ट आहे. पण, तुम्ही त्यातून कायमची सुटका झालेली नाही. तुमच्यावर मृत्यूचे संकट काही महिने असते, असा दावा संशोधकांनी केला आहे.Be careful! Death trap in a few months on corona-free patients; Researchers claim
कोरोनाचे संक्रमण, अन्य असलेले आजार आणि रोगप्रतिकारशक्ती याचा विचार प्रामुख्याने करावा लागेल. त्यात रोगप्रतिकारशक्ती महत्वाची भूमिका बजावते. कोरोनाची बाधा आणि सहव्याधीमुळे प्रकृती चिंताजनक बनते.
या दोन्ही रुग्णांमध्ये कोरोनातून बरे झाल्यानंतरही लक्षणे दीर्घकाळ राहू शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याचीही भीती असते असा दावाही या संशोधकांचा आहे.
इंग्लंडमधील संशोधनपत्रिका ‘नेचर’ मध्ये याबाबतचे अभ्यासवृत्त प्रसिद्ध झाले आहे. अमेरिकेतील साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानेही एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात म्हटलंय की कोरोनाची हलकी लक्षणे असलेल्या रुण्गांमध्ये काही महिन्यांनी नवी लक्षणे दिसत आहेत.
इंग्लंडमधील संशोधकांनी 87 हजार कोरोना रुग्ण आणि 50 लाख इतर रुग्णांच्या माहितीचा अभ्यास केला. यामध्ये कोरोनातून बरे झाल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत रुग्ण दगावण्याचा धोका 59 टक्क्यांपेक्षा अधिक असतो.
संशोधनातं असे स्पष्ट झाले की 6 महिन्यांत एक हजारांपैकी किमान 8 मृत्यूमुखी पडलेले रुग्ण असे होते ज्यांना दीर्घकाळ कोरोनाची लक्षणे होती. या रुग्णांचा मृत्यू कोरोनाशी जो़डून पाहिला जात नाही.
6 महिन्यांत एक हजारांपैकी मृत्यूमुखी पडलेले 29 रुग्ण असे होते जे 30 दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात उपचार घेऊन आले होते.
Be careful! Death trap in a few months on corona-free patients; Researchers claim
महत्त्वाच्या बातम्या
- शेअर बाजाराने फुंकले एलआयसीच्या महसुलात प्राण, गुंतवणुकीतून कमाविला ३७ हजार कोटी रुपयांचा विक्रमी नफा
- रिलायन्स इंडस्ट्रीजला यंदाच्या तिमाहीत गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट नफा
- ‘जमातियों के खिलाफ भौंक रहा था,अल्लाह ने जहन्नुम में सड़ने भेजा’ : रोहित सरदाना यांच्या निधनावर काही पत्रकार आणि कट्टरपंथियांचा जल्लोष
- उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलासा, कोरोना संदर्भातील विम्याचे दावे एक तासाच्या आता निकाली निघणार