• Download App
    बिसीसीआय कडून बायो बबलचे नियम अधिक कडक ! दर दोन दिवसांनी टेस्टिंग बाहेरील जेवणाला परवानगी नाही BCCI tightens bio bubble rules Meals outside testing every two days are not allowed

    बीसीसीआय कडून बायो बबलचे नियम अधिक कडक ! दर दोन दिवसांनी टेस्टिंग बाहेरील जेवणाला परवानगी नाही

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना आयपीएलचे सामने खेळवले जावेत की नाही यावरुन एक नवीन वाद सुरु झाला आहे. काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे.अशा परिस्थितीत बीसीसीआयने सर्व संघातील खेळाडूंसाठी बायो बबलचे नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. BCCI tightens bio bubble rules Meals outside testing every two days are not allowed

    बायो सिक्युअर बबलमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आता दर दोन दिवसांनी कोरोना चाचणी केली जाणार आहे. आतापर्यंत ही चाचणी पाच दिवसांनी केली जात होती. बायो सिक्युअर बबलमध्ये असणारे खेळाडू बाहेरील व्यक्तींशी संपर्कात येत नाहीयेत, परंतू भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने नियम अधिक कठोर करण्याचं ठरवलं आहे.



    याचसोबत बीसीसीआयने बायो सिक्युअर बबलमध्ये असलेल्या खेळाडूंना हॉटेल बाहेरील जेवण मागवण्यासाठीही मनाई केली आहे. याआधी खेळाडूंना हॉटेलबाहेरुन जेवणं मागवण्याची परवानगी देण्यात आली होती. दररोज हॉटेलमधलं तेच-तेच जेवण जेऊन कंटाळा येऊ नये यासाठी बीसीसीआयने खेळाडूंना आधी परवानगी दिली होती, परंतू सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआयने हा निर्णयही मागे घेतला आहे.

    याव्यतिरीक्त टेस्टिंगचं प्रमाण वाढवून बबल चे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत अशी माहिती बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमिन यांनी सर्व संघमालकांना दिली आहे. आतापर्यंत भारतातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं कारण देऊन ५ खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ज्यात जोश हेडलवूड, केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा, अँड्रू टाय आणि रविचंद्रन आश्विन यांचा समावेश आहे .

    BCCI tightens bio bubble rules Meals outside testing every two days are not allowed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य