वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात राहून काम करायचे असेल तर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) असो अथवा कोणतीही परकीय संस्था, सर्वांना भारतीय कायदे पाळूनच काम करावे लागेल, अशा स्पष्ट शब्दात परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी ब्रिटिश परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हरले यांना सुनावले आहे. BBC tax ‘survey’: All entities operating in India must comply with laws jaishankar says
जेम्स क्लेव्हरले हे जी 20 च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेसाठी सध्या भारतात आले आहेत. त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची हैदराबाद हाऊस मध्ये भेट घेतली. त्यावेळी भारत – ब्रिटन द्विपक्षीय संबंधांवर दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली. यावेळी वेगवेगळे मुद्दे दोघांनी एकमेकांसमोर मांडले. त्यामध्ये बीबीसी वरचे इन्कम टॅक्सचे छापे, निरव मोदी आणि विजय मल्ल्या प्रकरण यांचा समावेश होता. निरव मोदी आणि विजय मल्ल्या हे दोघेही भारतातून बँकांना फसवून पळून गेले आहेत. त्यांना ब्रिटनमध्ये आश्रय मिळाला आहे. त्यांच्यावर ब्रिटिश कायद्यानुसार खटला सुरू असल्याचा निर्वाळा ब्रिटिश परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हरले यांनी दिला.
त्याचवेळी त्यांनी बीबीसी वरच्या इन्कम टॅक्स छाप्यांसंदर्भातला मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी क्लेव्हरले यांना स्पष्ट शब्दात सुनावले. भारतात राहून कोणत्याही परकीय संस्थेला अथवा व्यक्तीला काम करायचे असेल, मग ती बीबीसी सारखी प्रतिष्ठित संस्था का असेना, त्यांना भारतीय कायदे पाळावेच लागतील. त्यानुसारच त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, असे जयशंकर यांनी क्लेवरले यांना सुनावले आहे.
बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर इन्कम टॅक्सने काही दिवसांपूर्वी छापे घातल्याच्या बातम्या आल्या होत्या. प्रत्यक्षात दोन्ही कार्यालयांचे सर्वेक्षण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने केले होते. बीबीसीने सुमारे 1200 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स बुडवल्याचे संशय आहे. या पार्श्वभूमीवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने बीबीसीवर सर्वेची कारवाई केली होती.
याच संदर्भात क्लेव्हरले यांनी माध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जयशंकर यांनी त्यांना भारतीय कायद्याची आठवण करून दिली. बीबीसी असो अथवा अन्य कोणीही सर्वांना भारतीय कायदे पाळावेच लागतील, अशा स्पष्ट शब्दात जयशंकर यांनी मोदी सरकारची भूमिका मांडली.
BBC tax ‘survey’: All entities operating in India must comply with laws jaishankar says
महत्वाच्या बातम्या
- ज्यांना आपला इतिहास माहिती नसतो त्यांना वर्तमान तर असतं परंतु भविष्य नसतं – देवेंद्र फडणवीस
- आम्ही गद्दारी केली असती तर खासदार तरी झाला असतात का??; उदय सामंतांचे संजय राऊतांच्या वर्मावर बोट
- CPR सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे फॉरेन फंडिंग लायसन्स निलंबित!!; कोणाचे आहे सेंटर??, का केली कारवाई??