• Download App
    एअर इंडियाच्या अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये वटवाघूळ, दिल्लीला परत आणून विमानाची इमर्जन्सी लँडिंग । BAT In Air India Flight Air India Flight Returns To Delhi IGI Airport After Bat Found In Plane

    BAT In Air India Flight : एअर इंडियाच्या अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये वटवाघूळ, दिल्लीला परत आणून विमानाची इमर्जन्सी लँडिंग

    BAT In Air India Flight : एअर इंडियाच्या दिल्लीहून अमेरिकेला जाणाऱ्या विमानात वटवाघूळ आढळल्याने विमानाची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. शुक्रवारी पहाटे 2.20 वाजता एअर इंडियाची फ्लाइट क्रमांक एआय -154 ने दिल्लीहून नेवार्क (न्यू जर्सी) कडे उड्डाण केले. टेक-ऑफच्या 30 मिनिटांनंतर पॅसेंजर एरियात वटवाघूळ दिसून आले. यानंतर हे विमान परत दिल्लीला आणण्यात आले, तिथे विमानाची इमर्जन्सी लँडिंग पहाटे साडेतीन वाजता करण्यात आली. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यातील मृत वटवाघूळ बाहेर काढले. BAT In Air India Flight, Air India Flight Returns To Delhi IGI Airport After Bat Found In Plane


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एअर इंडियाच्या दिल्लीहून अमेरिकेला जाणाऱ्या विमानात वटवाघूळ आढळल्याने विमानाची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. शुक्रवारी पहाटे 2.20 वाजता एअर इंडियाची फ्लाइट क्रमांक एआय -154 ने दिल्लीहून नेवार्क (न्यू जर्सी) कडे उड्डाण केले. टेक-ऑफच्या 30 मिनिटांनंतर पॅसेंजर एरियात वटवाघूळ दिसून आले. यानंतर हे विमान परत दिल्लीला आणण्यात आले, तिथे विमानाची इमर्जन्सी लँडिंग पहाटे साडेतीन वाजता करण्यात आली. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यातील मृत वटवाघूळ बाहेर काढले.

    एअर इंडियाच्या बोईंग 777-ईआर विमानाचा वापर दिल्ली ते नेवार्कदरम्यान उड्डाण सेवांसाठी केला जातो. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, “दिल्ली विमानतळ येथे दिल्ली-ईडब्ल्यूआर एआय-105 विमानासाठी विमानतळावर लोकल स्टँडबाय इमर्जन्सी जाहीर करण्यात आली. विमानाच्या लँडिंगच्या वेळी क्रूने केबिनमधील वटवाघळाविषयी माहिती दिली.

    वन्यजीव तज्ज्ञाला पाचारण

    शुक्रवारी, उड्डाणानंतर सुमारे अर्धा तास झाल्यानंतर वैमानिकाने विमानातील वटवाघळाविषयी हवाई वाहतूक नियंत्रणास माहिती दिली. त्यानंतर आपत्कालीन परिस्थिती जाहीर करून विमान परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानतळावरील कर्मचार्‍यांनी लँडिंगनंतर विमानात शोध घेतला असता त्यातील वटवाघूळ कोठेही सापडले नाही. यानंतर वन्यजीव तज्ज्ञांना बोलविण्यात आले. त्यांनी विमानात धूर केला आणि त्यानंतर वटवाघूळ आढळल. तथापि, तोपर्यंत ते मृत झाले होते.

    डीजीसीएने दिले चौकशीचे आदेश

    घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरी उड्डाण महासंचालक (डीजीसीए) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘एअर इंडियाचे बी 777-300ER विमान दिल्ली-नेवार्क दरम्यानच्या सेवेसाठी वापरले जाते. त्याचा नोंदणी क्रमांक व्हीटी-एएलएम आहे. या प्रकरणात ग्राऊंड सर्व्हिस कर्मचार्‍यांचे दुर्लक्षही उघडकीस आले आहे, कारण विमानाची प्रत्येक उड्डाणापूर्वी पूर्ण तपासणी केली जाते. जेव्हा सर्व ठीक असते तेव्हाच त्यास फ्लाइटसाठी क्लिअरन्स मिळतो.

    BAT In Air India Flight, Air India Flight Returns To Delhi IGI Airport After Bat Found In Plane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल