वृत्तसंस्था
बेंगळुरू : कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचे वरिष्ठ मंत्री बसवराज बोम्मई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. कर्नाटक भाजप विधीमंडळ पक्षाची आज सायंकाळी बैठक होऊन त्यामध्ये बसवराज बोम्मई यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. पक्षाचे केंद्रीय निरीक्षक शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी किशन रेड्डी हे बैठकीला उपस्थित होते. Basavaraj S Bommai to be the next CM of Karnataka announces BJP observer for the state and Union Minister Dharmendra Pradhan
मावळते मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बसवराज बोम्मई यांचे नाव विधिमंडळ नेते पदासाठी सुचविले. ते सर्व आमदारांना मान्य झाले आणि त्यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. बसवराज बोम्मई लिंगायत नेते असून ते कर्नाटकचे दिवंगत मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे चिरंजीव आहेत. एस. आर. बोम्मई हे जनता दलाचे वरिष्ठ नेते होते.
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासमवेत यांनी काम केले होते. बसवराज बोम्मई यांनी मात्र आपली राजकीय कारकीर्द भारतीय जनता पार्टीतून सुरू केली. ते येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा विश्वास कमावण्यात बसवराज यांना यश आले. भाजपचे संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि कर्नाटकातील अनेक मंत्री मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे मानण्यात येत होते. परंतु या शर्यतीत बसवराज मुंबई यांनी बाजी मारली, असे स्पष्ट झाले आहे.
Basavaraj S Bommai to be the next CM of Karnataka announces BJP observer for the state and Union Minister Dharmendra Pradhan
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी पाच दिवसांच्या दौऱ्यावर दिल्लीला , आज पंतप्रधानांना भेटणार..
- 98 टक्के संरक्षण कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचे मिळाले दोन्ही डोस : संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट
- इंडोनेशियात कोरोनामुळे शेकडो मुलांचा मृत्यू, जगाची चिंता वाढली
- पाकव्याप्त काश्मीरमध्ये इम्रान खान यांच्या तेहरीके इन्साफचा विजय, निवडणूक बेकायदा असल्याची भारताची भूमीका
- आसाम- मिझोराम सीमेवर हिंसाचार,६ पोलिस शहीद…