• Download App
    आमच्याशी संवाद साधण्याचीही ममतादीदींना नाही फिकीर, दिवंगत आनंद बर्मनच्या वडिलांचा गंभीर आरोप |Barman Family targets mammta didi

    आमच्याशी संवाद साधण्याचीही ममतादीदींना नाही फिकीर, दिवंगत आनंद बर्मनच्या वडिलांचा गंभीर आरोप

    विशेष प्रतिनिधी 

    कोलकता : सीतलकुची येथील हिंसाचारात मारला गेलेला भाजप कार्यकर्ता आनंद बर्मन याच्या कुटुंबीयांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.पाथन तोली गावात राहणारा आनंद १८ वर्षांचा होता.Barman Family targets mammta didi

    तो आयुष्यात प्रथमच मतदान करण्यासाठी गेला होता. मतदान केंद्रासमोर तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये चकमक झडली. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आधी मतदान केंद्राच्या दिशेने बॉम्ब टाकले आणि त्यानंतर आनंदला गोळी झाडली असा आरोप जगदीश यांनी केला.



    यास जबाबदार असलेल्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. आपल्या मुलाला कुणी मारले हे माहीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांच्या गोळीबारात ठार झालेल्या चार कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांविषयी ममता यांना तळमळ वाटते, पण आमच्याशी संवाद साधण्याची किंवा सहानुभूती दर्शविण्याची त्यांना फिकीर नसल्याचे आनंद याचे पिता जगदीश म्हणाले.

    Barman Family targets mammta didi

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!